Fight Between Existing And Ex MLA Groups In Khed Taluka Garampanchat 
कोकण

खेड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीत आजी माजी आमदारांच्या गटात सामना 

सकाळवृत्तसेवा

खेड ( रत्नागिरी ) - तालुक्‍यातील दापोली विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या 43 व गुहागर विधानसभा मतदार संघात येणाऱ्या 44 अशा एकूण 87 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 1 लाख 21 हजार 437 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्याच्या राजकारणात तीन पक्षाची महाविकास आघाडी असली तरी महाविकास आघाडी ग्रामपंचायतीमध्ये अबाधित राहण्याची चिन्हे येथील दोन्ही मतदार संघात नाहीत. आजी-माजी आमदार यांच्यातच राजकीय सामना होणार आहे. 

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, भाजप व कॉंग्रेस आदी पक्ष स्वबळावरच आपापले उमेदवार उभे करणार असल्याचे चित्र आहे. निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती दापोली व गुहागर या दोन्ही विधानसभा मतदार संघातील असल्याने या ग्रामपंचायती आपल्याकडे राहण्यासाठी आमदार योगेश कदम व माजी आमदार संजय कदम या दोघांनीही आपले वर्चस्व पणाला लावले आहे. भास्कर जाधव हेसुद्धा आपल्या वर्चस्वासाठी प्रयत्नशील आहेत. 

संजय कदम मतदार संघातील मतदारांशी कायम संपर्क ठेवून आहेत. विकासकामासाठी चांगले प्रयत्न करीत आहेत. मतदारांना नाराज न करता त्यांची कामे करून आपला प्रभाव मतदारसंघात पुन्हा प्रस्थापित करीत असल्याचे दिसून येत आहे. योगेश कदम यांनीदेखील मतदार संघातील युवाशक्तीला प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यांनी नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांचा चांगला मेळ घातला आहे. त्यांनी गेल्या वर्षभरात विविध विकासकामांचा धडाका लावला आहे. लॉकडाउन, निसर्ग चक्रीवादळ काळात मतदारसंघातील प्रत्येकाला उभारी देण्याचे काम केले. महाविकास आघाडी असली तरी ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने माजी आमदार आणि विद्यमान आमदार यांचा खरा राजकीय सामना होणार आहे. 

मनसे, भाजपची भूमिका निर्णायक 
दोन्हीही राजकीय पक्षांना आपापले दोन्हीही राजकीय पक्षांना आपापले पारंपरिक मतदार टिकवून ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. यात मनसे व भाजपाची भूमिका ही निर्णायक ठरणार आहे. दोघांनीही स्वतंत्र उमेदवारांसाठी चाचपणी सुरू केली आहे. या दोन्ही मतदार संघात भाजप व कॉंग्रेसचे अस्तित्व नावापुरतेच असले तरी काही ठिकाणी दोन्ही पक्षाचे उमेदवार पाडण्याइतपत त्रासदायक ठरू शकतील. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: महाराष्ट्रासाठी अर्शिन कुलकर्णीचं शतक, तर पृथ्वी शॉची फिफ्टी, मुंबईकडूनही तिघांची अर्धशतकं; पण विदर्भाचा डाव गडगडला

Palghar : भाजपने पालघर साधू हत्याकांडाचे आरोप ज्यांच्यावर केले त्याच नेत्याला घेतलं पक्षात, प्रवेशाचा मोठा कार्यक्रम

Accident News: मक्का मदिनाजवळ भीषण अपघात! ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू; डिझेल टँकरला बस धडकली अन्...

Vanaz Metro Subway Issues : रस्ता ओलांडायचा तर भुयारी मार्गातूनच; पण अनधिकृत पार्किंगमुळे पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीला

Latest Marathi Breaking News : गुंड निलेश गायवळवर चौथा मोक्का दाखल

SCROLL FOR NEXT