Finally the Gudi from Nadgive took off after 19 days kokan marathi news 
कोकण

अखेर नडगिवेतील ती "गुढी'  19 दिवसानंतर उतरवली.... 

सकाळ वृत्तसेवा

खारेपाटण (रत्नागिरी) : येथील शहरालगतच्या नडगिवे गावात त्या कुटुंबाच्या घरावरील गुढी तब्बल 19 दिवसानंतर कोरोनामुक्‍त झालेल्या व्यक्‍तीच्याच हस्ते उतरवण्यात आली. प्रचंड आत्मबळावर त्याने "कोरोना' संकटावर सहज मात केली. त्याबाबतचे समाधान आणि आनंद ग्रामस्थांमधूनही व्यक्‍त झाले. 


होळीसणासाठी आलेल्या नडगिवेतील त्या चाकरमान्याने गुढी पाडव्या दिवशी घरासमोर गुढी बांधली. नैवेद्यही दाखवला अन्‌ दुसऱ्याच क्षणी दारात आलेल्या आरोग्य पथकाने त्या व्यक्‍तीला थेट जिल्हा रूग्णालयातच दाखल केले. त्या मुलासोबत त्याच्या आईला देखील जिल्हा रूग्णालयात आणले. तीन दिवसानंतर आलेल्या अहवालात त्या व्यक्‍तीला "कोरोना'ची लागण झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर जिल्ह्यासह सपूर्ण नडगिावे गावात खळबळ उडाली. यात त्या चाकरमान्याच्या दारावरील गुढी तशीच उभी राहिली होती. 

प्रचंड आत्मबळावर "कोरोना'वर मात; ग्रामस्थांमध्येही समाधान 

निर्व्यसनी आणि उत्कृष्ट कबड्डीपटू असलेला नडगिवेतील चाकरमानी होळीसाठी मंगलोर एक्‍सप्रेसमधून गावी आला होता. याच एक्‍सप्रेसमधून उडपी पर्यंत प्रवास करणाऱ्या एका सहप्रवाशाला "कोरोना' झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नडगिवेतील त्या व्यक्‍तीलाही जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवले होते. तब्बल अठरा दिवस तेथे विजनवास सहन करून नडगिवेतील त्या व्यक्‍तीने "कोरोना'वर सहज मात केली. पुढील सर्व चाचण्या निगेटीव्ह आल्या. एवढंच नव्हे तर त्या व्यक्‍तीपासून अन्य कुणालाही लागण झाली नसल्याचेही निष्पन्न झाल्यानंतर ती व्यक्‍ती आईसह नडगिवेतील घरी पोचवली. तेथे गुढीची विधीवत पूजा करून ती उतरविण्यात आली.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: 7 वर्षं गुहेत जगली, मुलींना कसं सांभाळलं? किराणा कशी आणायची... संपूर्ण कहाणी ऐकून बसेल धक्का, रशियन महिलेचा व्हिडिओ

माेठी चाेरी! 'राहुरीतील सराफा दुकान फाेडले'; ३२ तोळे सोने, ३० किलो चांदीच्या दागिन्यांसह ६० लाखांचा ऐवज चोरीस

BSE Bomb Blast Threat : बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी; बीएसईच्या वेबसाईटवर ईमेल अन् पोलिस अलर्टवर

'हॅरी पॉटर' टीव्ही मालिकेतील हॅरी पाहिलात का? फस्ट लूक व्हायरल, फोटो पाहून तुम्हालाही बालपणाची आठवण येईल

Vilas Bhumre: अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री, संभाजीनगरकडे विशेष लक्ष देणार

SCROLL FOR NEXT