first plasma therapy apheresis unit established all over state in ratnagiri online inauguration by CM uddhav tharye 
कोकण

एक जणाचा प्लाझ्मा देतो चार जणांना जीवनदान

राजेश कळंबटे

रत्नागिरी : कोकणला लाटांचा सामना कसा करायचा, ते शिकवण्याची गरज नाही. पण, कोरोनाबाबत दुसरी लाट न येऊ देणे, ही प्राथमिकता आहे. कोरोनामुक्त झालेली एक व्यक्ती एका महिन्यात दोन वेळा प्लाझ्मा दान करून चार जणांचा जीव वाचवू शकते. त्यामुळे येणाऱ्या काळात मृत्यूदर कमी होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

राज्यातील पहिले प्लाझ्मा थेरपीसाठीचे अफेरेसिस युनिट रत्नागिरी शासकीय रुग्णालयात सुरू झाले असून त्याच्या ऑनलाईन उद्‌घाटप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुंबईतून पालकमंत्री ॲड. अनिल परब, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र उदय सामंत यांच्यासह खासदार विनायक राऊत, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, आमदार राजन साळवी, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम आदी सहभागी झाले होते. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, कोरोना विरुद्धचा लढा निर्णायक वळणावर आहे. त्यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम पर्याय आहे. याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करून द्या. दुसरी लाट येऊ द्यायची नाही, यासाठी शपथ घ्या. 

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, ‘‘प्लाझमा थेरेपी सुविधा केंद्रामुळे सगळे अहवाल एकाच ठिकाणी रुग्णांना मिळतील. कोरोनाबरोबर इतर आजारांचे अहवालही मिळूू शकतात. त्यासाठी खूप सरकारी खर्च व्हायचा, पण तो आता कमी होणार आहे. राज्यात मृत्युदर जास्त असणारे जे चार जिल्हे आहेत, त्यात रत्नागिरीचा समावेश आहे. या जिल्ह्यात मृत्यूदर कमी होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणेने काम करावे. 

मृत्यूदर एक टक्‍क्‍याखाली : सामंत

रोज ३५ ते ४० रुग्ण पॉझिटिव्ह होणाऱ्या रत्नागिरी तालुक्‍यासह माझ्या मतदारसंघात आता आकडा शुन्यावर आला. यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम व जिल्हा प्रशासनाचे यश आहे. प्लाझ्मा उपचार सुविधेतून मृत्यूदर एक टक्‍क्‍याखाली येईल, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'यार हे कोणाला बाहेर ठेवणार?', भारताचा संघ पाहून शोएब अख्तर चक्रावला; पाहा काय म्हणाला

Banjara community Reservation : बंजारा समाजाला हैद्राबाद गॅझेटियरनुसार आरक्षण द्या; आ. संजना जाधव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Maharashtra Rain Update: मुंबई पुणेकरांनो सावधान! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा

Pune Police : घराचा धागा पुन्हा जुळला; पोलिसांनी तरुणीला दिला मायेचा आधार

Latest Marathi News Updates Live: रानडुक्कर शिकारप्रकरणी सात जण अटकेत

SCROLL FOR NEXT