fish of rupees 1000 crore not sales due to corona and export stop in ratnagiri 
कोकण

मासळी व्यवसाय कोरोनाच्या गळाला ; कोकणला कोट्यावधीचा फटका

राजेश कळंबटे

रत्नागिरी : चीनविरोधातील वातावरण आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका कोकणातील मत्स्य प्रक्रिया निर्यातीला बसला आहे. किमान एक कोटींचा माल पडून राहिल्याने प्रक्रिया उद्योग संकटात आहेत. पर्यटन थांबल्याने थायलंड, मलेशियातील बांगड्यांच्या निर्यातीवर परिणाम झाल्याने दर घसरले आहेत. चीनला पर्यायी आफ्रिकन देशातही मालाची मागणी कमीच आहे.

मासळी व्यवसायातून दरवर्षी हजारो कोटींची उलाढाल होत असून, निर्यातीतून कोट्यवधीचे परकीय चलन मिळते. परदेशात फ्रोजन मासळीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. प्रक्रिया करून क्रोकरी आणि रिबन फिश (बळा) निर्यात केला जातो. मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने मासळी निर्यातीला लागलेले ग्रहण अद्यापही सुटलेले नाही. निर्यातीचे नियम, अटींचा फटका बसत आहे.

फ्रोजन मासळीची सर्वाधिक मागणी चीनमध्ये आहे. कोकणातून महिन्याला सरासरी ५०० कोटींची प्रक्रिया केलेल्या मासळीची निर्यात होते. कोरोना प्रादुर्भावामुळे मालाचीही कसून तपासणी होते. संशयास्पद आढळले, तर तो माल रद्द केला जातो. गेल्या तीन ते चार महिन्यांत अनेक निर्यातदारांना याचा फटका बसला. सध्या ८० टक्‍के माल पडून आहे. कोरोनाबरोबरच जागतिक स्तरावर चीनविरोधी ट्रेंड असल्याने निर्यात धोरण अडचणीत आले आहे. 

माल पाठविण्यापूर्वी चीनमधील कंपन्यांकडून ३० टक्‍केच पेमेंट मिळते. उर्वरित ७० टक्‍के पेमेंट मालाची कोरोना तपासणी झाल्यानंतर होते. चीनऐवजी आफ्रिका देशात निर्यात सुरू केली गेली; परंतु तिकडे तेवढी मागणी नसल्याने चीनमधील वातावरण निवळण्याची प्रतीक्षा उद्योजकांना आहे.

बांगडा माशांवरही कोरोनाचे संकट

मलेशिया, थायलंडला निर्यात होणाऱ्या बांगडा माशांवरही कोरोनाचे संकट आहे. पर्यटन थांबल्याने या दोन्ही देशांत जाणारा भारतातील पर्यटक घटला आहे. या दोन्ही देशांमधील बांगड्याची मागणी कमी झाल्याने त्याचा सर्वाधिक भार देशी मार्केटवर पडत आहे. ३२ किलोच्या डिशला चार ते सहा हजारऐवजी एक हजार ६०० ते एक हजार ९०० रुपये मिळत आहेत. बांगड्याचा दर कमी झाल्याचे स्थानिक मच्छीमारांनी सांगितले.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT