Fisherman dead drowns sea ratnagiri harne
Fisherman dead drowns sea ratnagiri harne 
कोकण

रत्नागिरी : समुद्रात बुडून मच्छिमाराचा मृत्यू 

राधेश लिंगायत

हर्णे - मासेमारीसाठी निघालेल्या मच्छिमाराचा खडपात जाताना समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. हर्णे बंदरामध्ये मच्छिमाराचा दुर्घटनेतून मृत्यू ही तिसरी घटना असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मधुकर बामा पाटील ( वय-४०) हे कोणत्याही मासेमारी नौकेवर कायमस्वरूपी खलाशी म्हणून नव्हते तर ज्या नौकेवर खलाश्याची गरज भासेल अश्या नौकेवर जात असत. असेच आज सकाळी ते एका नौकेवरून आले आणि दुसऱ्या नौकेवर मासेमासाठी जाणार होते. त्यासाठी सकाळी घरी जाऊन आंघोळ करून पत्नीला मी दुसऱ्या नौकेवर मासेमारीकरिता जात आहे असे सांगून निघाले. ते हर्णे बाजारातून वस्तू खरेदी करून बंदराच्या दिशेने जात होते. तेवढ्यात शौचास जाण्यासाठी म्हणून ते हर्णे किनारपट्टीलगत असणाऱ्या चांभार खडपात गेले. तिथे जात असतानाच त्यांचा पाय घसरून किनारपट्टीलगतच समुद्राच्या पाण्यात पडले आणि तिथेच त्यांचा बुडून मृत्यू झाला असल्याची माहिती हर्णे पोलिसांनी दिली आहे. 

 मधुकर पाटील हे घरात एकटेच कमावणारे होते. पत्नी आपली ऐपत असेल तेवढीच मासळी खरेदी करून बाजाराला जात असे. त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन मुले आहेत. तीही अजून शाळा शिकत आहेत. त्यामुळे आता पुढचं कोण बघणार असा यक्ष प्रश्न त्यांच्या पत्नीपुढे पडला आहे. घरचा आधारच गेल्यामुळे पाटील कुटुंब हे निराधार झाले आहे.
 

 या घटनेची तक्रार कृष्णा चोगले यांनी दिली. पाटील यांचा मृतदेह बराचवेळ खडपात होता. तो पोलिस पाटील प्रकाश वागजे यांनी हजर होऊन स्थानिकांच्या मदतीने किनाऱ्यावर आणला. घटनेचा पंचनामा हर्णे पोलिसांकडून करण्यात आला आहे. 

 हर्णेमध्ये किनारपट्टीलगत मच्छिमाराचा बुडून मृत्यू ही तिसरी घटना घडली आहे. पहिल्यांदा ४ फेब्रुवारी रोजी फत्तेगड येथील राजा पावसे यांचा मासेमारीला जात असताना समुद्रात बुडून मृत्यू झाला. दुसरी घटना ६ फेब्रुवारीला बुरोंडी येथील नारायण खांडेकर यांचा बोटीतून पडून मृत्यू झाला तर तिसरी  घटना आज मधुकर पाटील यांची घडली. त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. 

 संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : व्यंकटेश अय्यर - मनिष पांडेने केकेआरचा डाव सावरला; 15 षटकात मारून दिली चांगली मजल

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT