five persons corona positive report in ratnagiri 
कोकण

त्या धक्कादायक बातमीने रत्नागिरी प्रशासन हादरले....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : मंगळवारी सकाळी  16 जणांचे तपासणी अहवाल कोल्हापूर येथून  प्राप्त झाले असून यातील 5 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात दापोलीतील तिघांचा तर दोन गुहागर येथील आहेत.अकरा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्हयातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 52  झाली आहे.

दापोली तालुक्यात आज तीन जणांचा कोरोनाबधित असल्याचा अहवाल आला असून तालुक्यातील कोरोनाबधित रुग्णांची संख्या आता 8 वर पोचली आहे. 3 मे रोजी दापोली येथे मुंबई येथून आलेल्यांचे शहरातील नवभारत छात्रालयात संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले होते. या सर्वांचे स्वँबचे नमुने घेण्यात आले होते. ते मिरज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते . आज त्याचा अहवाल पॅाझिटीव्ह आला असून त्यातील तीन जण कोरोना बाधीत आहेत. अहवाल येण्याअगोदरच काल तालुका प्रशासनाने सर्वाना त्यांच्या गावी पाठविले होते .त्यांची  गावातील समितीने व्यवस्था करावयाची आहे.


कोरोनाबधित झालेल्यांचे मूळ गाव व वय पुढील प्रमाणे :
  कोळबांद्रे (वय 48), कळकी ( वय 26), भोपण (वय 24) आहे, हे तिघे कालच गावी गेले असून त्यांचे गावातील शाळेत अलगिकरण करण्यात आले.  हा अहवाल आल्यावर आज त्यांना दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले . तेथेच त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येणार आहेत.


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Live Updates Marathi: जंतरमंतरवर पोलिसांचा पुन्हा लाठीचार्ज

Panshet Flood Affected : पुण्यातील ६० हजार विस्थापित नागरिकांच्या जमिनीचा प्रश्न अखेर सुटला; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार

CJP Protest: राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेला जे.पी. नड्डांचं उत्तर; काँग्रेस सत्तेत असलेल्या राज्यातील पेपरफुटीचा वाचला पाढा

IND vs ZIM: 'आयर्लंडने डोळे उघडले' झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेपूर्वी कॅप्टन श्रेयस अय्यरचे मोठे वक्तव्य; म्हणाला, युवा खेळाडूंनी...

Stray Dog Attack : सहा महिन्याच्या झोपलेल्या मुलावर भटक्या कुत्र्याचा हल्ला; मुलगा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT