Dengue Canva
कोकण

पुरानंतर खेडमध्ये 'या' रोगाचे संकट ; 22 रुग्णांवर उपचार सुरू

गाळ, चिखलाचा परिणाम; खेड पालिकेकडून जनजागृती

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : पुराच्या संकटातून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या खेडवासियांना (Khed) आता डेंग्यूचा (Dengue) सामना करावा लागतो आहे. पुरामुळे शहरात साचून राहिलेले पाणी, गाळ, चिखल यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली असून खेड शहर आणि आजूबाजूच्या परिसरात डेंग्यूची साथ झपाट्याने पसरू लागली आहे. सद्यस्थितीत २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जुलै महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्यांना पूर आला. पुराचे पाणी खेडच्या बाजारपेठेत आणि आजूबाजूच्या गावांमध्ये घुसल्याने हाहाकार उडाला. दोन दिवसांनंतर पूर ओसरला. पूर ओसरल्यावर पूरग्रस्त भागात चिखल, गाळ आणि पाण्याची डबकी तयार झाली. पुरात दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील अन्नधान्य व इतर सामान कुजून गेले. त्यामुळे साफसफाईला सुरवात झाल्यावर शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली.

शहरात सगळीकडे पसरलेला झालेला चिखल, निर्माण झालेली डबकी यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली.

शहरात सगळीकडे पसरलेला झालेला चिखल, निर्माण झालेली डबकी यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झाली. महापुरानंतर येणारी संभाव्य रोगराई टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने तत्काळ साफसफाईचे काम हाती घेतले. रोगराई पसरू नये, यासाठी निर्मुलन मोहीम हाती घेण्याबरोबरच आरोग्य शिबिराचेही आयोजन केले. मात्र तरीही डेंग्यूने शहर व पसिरात मोठ्या प्रमाणात हातपाय पसरायला सुरवात केली आहे. पुरातून सावरत असताना कोरोनापाठोपाठ डेंग्यूने हातपाय पसरायला सुरवात केल्याने आरोग्य विभागाने दक्षता घेत प्रतिबंधक उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे.

कीटकनाशक फवारणी

डेंग्यूची साथ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कीटकनाशक फवारणी करण्यास सुरवात केली असून नागरिकांना डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, याबाबत खेड पालिकेकडून जनजागृती केली जात आहे.

दहा रुग्णांपैकी आठ रुग्ण डेंग्यूचे

रुग्णालयात येणाऱ्या दहा रुग्णांपैकी दोन रुग्ण कोविडचे, तर आठ रुग्ण डेंग्यूचे असल्याचे निष्पन्न होत आहेत. आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या तालुक्यात १७४ कोविडचे रुग्ण, तर डेंग्युचे २२ रुग्ण आढळून आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT