food packet distribution in ratnagiri people kokan marathi news
food packet distribution in ratnagiri people kokan marathi news 
कोकण

खासदारांची आली सुचना आणि त्यांनी केले हे......

मुझफ्फर खान

चिपळूण (रत्नागिरी) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर गरजू लोकांना मदत करा अशी सूचना रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी मतदार संघातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना केली. खासदारांचा आदेश आल्यानंतर चिपळूण - संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष बाळा कदम आपल्या सहकारी कार्यकर्त्यांना घेवून गरजूंच्या मदतीला धावले. शहरातील झोपडपट्टीत राहणार्‍या लोकांना महिनाभर पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा त्यांनी केला.      

हेही वाचा-सतर्कता..आणखी सहा नमुने तपासणीसाठी     
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात वेगवेगळ्या उपायोजना केल्या जात आहेत. खासदार विनायक राऊत यांनी मतदार संघातील नागरिकांना खासदार निधीतून मास्क आणि सॅनिटायझर पुरवण्याची घोषणा केली आहे. मात्र संचारबंदीमुळे सामान्य कुटूंबियांचे हाल होत आहेत. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ज्यांचे हातावरती पोट आहे, अशा लोकांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी मतदार संघातील कार्यकर्त्यांनी घ्यावी अशी सूचना खासदार राऊत यांनी केली होती.

खासदारांच्या आदेशाला बाळा कदमांनी दिला प्रतिसाद​

संगमेश्‍वर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष बाळा कदम यांनी खासदारांच्या आदेशाचे पालन करत झोपडपट्टीत राहणार्‍या आतिशय सामान्य कुटूंबातील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पुढाकार घेतला. शिवसेनेच्या वडनाका शाखेचे प्रविण पेडणेकर, बंधु कदम, पिंट्या कोवळे, बापू कदम
रामा जाधव, बाबू कदम यांनी नियोजन करून दामू गुरव, तुषार गुरव, आकाश कदम,सुशांत गुरव, निहार कोवळे, ओम विषकर्मा, राजेश कदम, सिद्धेश गुरव, राहुल गुरव, अभिषेक कदम, अजय कदम, सोहम कदम, प्रणव कदम, निखिल पवार, विवेक पवार, साईराज कदम, यश कोवळे, तेजस शिंदे, मंदार शिंदे, अवि जगदाळे, अविनाश नवरत आदी कार्यकर्त्यांचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने शहरात सर्व्हेक्षण करून गरजू लोकांची यादी तयार केली. चिपळूणचे पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या हस्ते झोपडपट्टीत राहणार्‍या गरजूंना मदत वाटप करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT