Konkan Nilesh Rane esakal
कोकण

Konkan Politics : सर्वस्व पणाला लावून भाजपसाठी काम करा; माजी खासदार नीलेश राणेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

आगामी निवडणुका लक्षात घेऊन आपल्याला झोकून देऊन काम करावे लागणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सगळ्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून भविष्यात पक्षासाठी काम करावयाचे आहे.

राजापूर : संपूर्ण कोकणात (Konkan) आपल्याला भाजप पक्ष संघटना अधिक मजबूत करावयाची आहे. त्यासाठी नव्या जोमाने मैदानात आपण उतरलो असून सगळ्यांनी आपले सर्वस्व पणाला लावून भविष्यात पक्षासाठी काम करावयाचे आहे, असा कानमंत्र भाजपाचे (BJP) नेते माजी खासदार नीलेश राणे (Nilesh Rane) यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला.

सिंधुदुर्गकडून रत्नागिरीकडे आगमन होताना राजापुरात महामार्गावर हातिवले येथील टोलनाक्यावर व त्यानंतर पुढे राजापूर शहरात जकातनाक्यावर नीलेश राणे यांचे राजापूर तालुका भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. हातिवले येथे ढोलताशांच्या गजरात स्वागत झाले. राजापूर दक्षिण मंडळचे तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, पूर्व मंडळ तालुकाध्यक्ष भास्कर सुतार यांसह पदाधिकाऱ्यांनी राणे यांचे स्वागत केले.

राणे म्हणाले, आपण सर्वांनी केलेल्या स्वागताने भारावलो आहे. रत्नागिरीत नियमित आलो. कधी खूप दिवसांनी आलो तरी स्वागतात कोणतीही कमतरता कधी राहिली नाही. हे प्रेम आणि आशीर्वाद कायम असेच राहूद्या. कोकणात भाजपा पक्ष संघटन अधिक बळकट करावयाचे आहे.

आगामी निवडणुका लक्षात घेता यासाठी आता आपल्या प्रत्येकाला झोकून देऊन काम करावे लागणार आहेत, हे लक्षात घ्या आणि पक्षाचे काम करा, असेही त्यांनी सांगितले. या वेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर, विधानसभा निवडणूक प्रमुख उल्का विश्वासराव, जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव, ओबीसी सेलचे प्रदेश सचिव अनिलकुमार करंगुटकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT