a former soldier has been injured eyes because of wrong medicine 
कोकण

अबब... कानाचे औषध दिले डोळ्यासाठी...

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) - सिंधुदुर्गनगरी येथील इसीएचएस पॉलिक्‍लिनिक (मिलेटरी रुग्णालय) येथे एका माजी सैनिकाला डोळ्यात घालण्यासाठी कानात घालण्याचे औषध दिल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. रामचंद्र लक्ष्मण सावंत असे माजी सैनिकाचे नाव असून त्यांच्यावर पुढील औषधोपचार सुरू आहेत. या चुकीच्या औषधामुळे त्यांच्या डोळ्याला जखमा झाल्या आहेत. या घटनेला पोलिक्‍लिनिकचे अधिकारी डॉ. पाटणकर यांनीही दुजोरा दिला आहे.

मिलेटरी रुग्णालयातील चुकीच्या औषधाचा माजी सैनिकास फटका

कुडाळ पंचायत समितीचे माजी सभापती मोहन सावंत यांचे वडील तथा शिवापूर येथील माजी सैनिक रामचंद्र लक्ष्मण सावंत हे आपले डोळे तपासण्यासाठी ओरोस येथील इसीएचएस पॉलिक्‍लिनिकमध्ये आले होते. त्यांचे डोळे तपासल्यानंतर त्यांना तेथे एक आय ड्रॉप डोळ्यात घालण्यासाठी लिहून देण्यात आला. तो त्यांनी तेथेच औषध कक्षातून घेतला.
घरी गेल्यावर रात्री त्यांनी हे औषध डोळ्यात घातले. त्यानंतर त्यांचे डोळे चुरचुरायला लागले; पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले व पुन्हा थोड्या वेळाने ड्रॉप टाकला. त्यानंतर मात्र त्यांचे डोके बधिर होऊ लागले व त्यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे सावंत या त्यांच्या मुलाने त्यांना तातडीने रातोरात शिवापूर येथून साळगाव येथे आणले. तेथे डॉक्‍टरांना दाखविले असता त्यांच्या डोळ्यात औषधामुळे जखमा झाल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा तो दिलेला ड्रॉप बघितला असता तो मोक्‍सीफ्लोक्‍स असा डोळ्यात घालायचा ड्रॉप नसून कानात घालायचा ड्रॉप असल्याचे 
सांगितले. आज सावंत यांनी वडीलांना ओरोस येथील इसीएचएस पॉलिक्‍लिनिक या सैनिक दवाखान्यात आणले. औषधालयातील कर्मचाऱ्याने चुकीचे औषध दिले असल्याचे
पुढे आले.

पुन्हा असा प्रकार घडू नये

रुग्णाचे चिरंजीव श्री. सावंत यांनी सांगितले, ‘‘आम्ही माजी सैनिकांची मुले आहोत. हॉस्पिटलबद्दल आदर आहे; पण माझ्या वडिलांच्या बाबतीत जे झाले ते गंभीर आहे. त्यांना रातोरात डॉक्‍टरकडे घेऊन जाऊ शकलो; पण इतर सर्वसामान्य माजी सैनिकांचे काय? माजी सैनिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून औषधोपचारासाठी येथे येतात. त्यांची माफक अपेक्षा औषध मिळण्याची असते. अशी चुकीची औषधे देणे फारच गंभीर आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी हा प्रकार सैनिक हॉस्पिटलच्या निदर्शनास आणून दिला.’’

चुकीचे औषध दिल्याचे मान्य

याबाबत ओरोस येथील इसीएचएस पॉलिक्‍लिनिक हॉस्पिटलचे मेडिकल ऑफिसर डॉ. पाटणकर यांच्याशी संपर्क साधला असता हा प्रकार घडल्याचे मान्य केले. आपण औषध बरोबर लिहून दिले होते; मात्र औषधालयात असलेल्या कर्मचाऱ्याने दुसरेच औषध दिले, असे डॉ.पाटणकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडिया पोहचली जपानला! आता कधी होणार सामने? जाणून घ्या Timetable

Pune Crime: ‘आमदारगिरी’चा बनाव तरुणाच्या अंगाशी! पुण्यात ऑडीवर लावलं 'आमदार' स्टिकर, मद्यधुंद अवस्थेत कार पळवणाऱ्या २३ वर्षीय तरुणाला घेतलं ताब्यात

Nandigram Express : नंदिग्राम एक्स्प्रेस चुकीच्या रुळावर लोको पायलटच्या सतर्कतेने अनर्थ टळला, किनवट स्थानकावर दोन तास खोळंबा

Latest Marathi News Update : मराठा समाजाला न्याय द्या, पण ओबीसींचे वाटोळे सरकारने केले विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

Japan's Population: ११४ वर्षांच्या आजी अन् ११२ वर्षांचे आजोबा! काय आहे जपानमधील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य?

SCROLL FOR NEXT