Four Days Ultimatum To Ship In Mirya Port Ratnagiri Marathi News 
कोकण

अद्याप मिऱ्यातील ते जहाज `जैसे थे`; यांनी दिला चार दिवसांचा अल्टिमेटम

सकाळवृत्तसेवा

रत्नागिरी - मिऱ्या येथे अडकलेले बसरा स्टार जहाज किनाऱ्यावर रुतले आहे. त्यामुळे बंधाऱ्यावर आपटण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जहाजामधील धोकादायक असलेले ऑईल आणि 25 हजार लिटर डिझेल काढण्यात एजन्सीला यश आले आहे.

मात्र किनारा सुरक्षिततेच्यादृष्टीने येत्या चार दिवसामध्ये जहाज काढा, स्क्रॅप करा, पण काहीतरी निर्णय घ्या, असा अल्टीमेटम प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. संजय उगलमुगल यांनी जहाज एजन्सीला दिला आहे. या जहाजाच्या मुक्कामाला आज महिना झाला. 

जहाज वाचविण्याच्यादृष्टीने जोरदार मोहीम सुरू झाली आहे. भारत सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्‍निशियन) मंचलवार यांनी जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी यांना घेऊन जहाजावरील जळके ऑइल काढण्याची मोहिम हाती घेतली. ऑईल गळती होऊन किनाऱ्याला धोका निर्माण होण्याची शक्‍यता होती. ते टाळण्यासाठी प्रादेशिक बंदर विभागाने जहाजाच्या एजन्सीला नोटीस बजावली होती.

त्यानुसार पहिल्या टप्प्यात ऑईल काढण्यास सुरवात झाली. पंप बसवून पाईपद्वारे किनाऱ्यावर मोठे बॅरेल ठेवून त्यामध्ये हे ऑईल काढण्यात आले. 30 ते 35 बॅरेल म्हणजे सुमारे साडेसहा ते सात हजार लिटर ऑईल काढण्यात आले. त्यानंतर लगोलग जहाजामधील सुमारे 25 हजार लिटर डिझेलसाठा सुरक्षित काढण्यात आला आहे. 

किनारा सुरक्षेच्यादृष्टीने बंदर विभागाने एजन्सीला चार दिवसाचा अल्टीमेटम दिला आहे. चार दिवसामध्ये हजार काढा किंवा स्क्रॅप करा, अशी स्पष्ट सूचना दिली आहे. 

जिल्हा प्रशासनाकडे तक्रार 
गेल्या महिन्यात निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात हे जहाज सापडले. दक्षिण आफ्रिकेतून ते शारजा-दुबईला निघाले होते. मात्र वादळाचा धोका असल्याने ते नर्मदा जेटीला आश्रयाला आले होते. वादळामुळे अजस्र लाटांच्या तडाख्यात जहाजाचा नांगर तुटून ते भरकटत मिऱ्या किनारी लागले. आज महिनाभरानंतरही जहाज काढण्याच्या प्रक्रियेला अपेक्षित गती मिळत नसल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे किनारा सुरक्षा मंचाने केली आहे.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पहिलीपासून हिंदी भाषा! त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल मुदतीपूर्वी? अहवालात नेमकं काय?

``थ्रू ए डिप्लोमॅट्स लेन्स’’

Pakistani Terrorist: मोठी बातमी! ३० ते ३५ दहशतवादी लपून बसलेत; भारतीय लष्कराची शोधमोहीम सुरू, पण कुठे?

Self-driving car technology 2030 forecast : रस्त्यावरचा नवा 'धुरंधर'; चालकविरहित स्वयंचलित वाहनांच्या युगाचा उदय!

PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींचा जुना फोटो काँग्रेस नेत्याने केला व्हायरल; शपथविधी सोहळा अन् जमिनीवर बसलेले मोदी

SCROLL FOR NEXT