four vehicle destroyed in fire from rajapur ratnagiri 
कोकण

आगीत चार वाहने जळून खाक ; आज्ञाताच्या गैरकृत्यामुळे लाखोंचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर खंडेवाडी येथे एक रिक्षा व तीन दुचाकी अशी चार वाहने आगीत जळून खाक झाली आहेत. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अज्ञाताने जाणूनबुजून गाड्यांना आग लावल्याचे बोलले जात असून या प्रकरणी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. 

खंडेवाडी येथील रमेश खंडे यांच्या दोन दुचाकी व त्यांचे भाऊ अविनाश खंडे यांची रिक्षा व एक दुचाकी अशी चार वाहने त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यालगतच्या शेडमध्ये पार्क करून ठेवलेली असतात. सोमवारी मध्यरात्री खंडे यांच्या घरातील सर्व मंडळी झोपलेली असताना शेडमध्ये लावलेल्या गाड्यांना अचानक आग लागली.

रात्री १२.३० च्या दरम्यान या शेडच्या लगत राहणाऱ्या बांदिवडेकर कुटुंबीयांच्या ही घटना निदर्शनास आली. त्यानंतर रूपेश बांदिवडेकर, प्रसन्न बांदीवडेकर यांच्यासह बांदिवडेकर कुटुंबातील सर्वांनी तत्काळ धाव घेत पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला. याबाबत खंडे यांनी राजापूर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली असून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, अज्ञाताने जाणूनबुजून गाड्या जाळल्याचे बोलले जात आहे. 

तोपर्यंत सर्व वाहने जळून खाक 

दरम्यान, खंडे कुटुंबालाही याबाबत माहिती देण्यात आली. खंडे कुटुंबीयांनीही धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला; मात्र आग आटोक्‍यात येईपर्यंत सर्व वाहने जळून खाक झाली होती. या आगीत तीन दुचाकी व रिक्षा अशा चारही गाड्या जळून खाक झाल्याने खंडे यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : खरातचे कारनामे संपेनात ! आधी पीडित महिलांची अब्रू लुटायचा अन् मग श्रीमंत पुरूषांशी लैंगिक संबंध ठेवायला लावायचा...

Tungnath Covered in Snow: बर्फाच्या पांढऱ्या चादरीत न्हालेलं तुंगनाथ मंदिर; १२,०७३ फूट उंचीवरील या पवित्र शिवधामाची संपूर्ण माहिती जाणून घ्या एकाच क्लिकवर

Kolhapur Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीतून चालते कोल्हापूरचे अर्थचक्र; पण अव्यवस्थेमुळे अडखळते व्यापाऱ्यांचे स्वप्न!

Jalna News: बेपत्ता १०७ महिलांचा लागला शोध; एकोणीस ठाण्यांसह ह्युमन ट्रॅफिकिंग पथकाची कामगिरी

Buldhana Farmer: अतिवृष्टीचा फटका; कर्जबाजारी साखरखेर्डा येथे शेतकऱ्याने संपवल जीवन

SCROLL FOR NEXT