Four year old monkey fear in kokan marathi news 
कोकण

कोकणात चार वर्षांच्या माकडाची दहशत....

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : आरोस वरचीआळी येथे सुमारे चार वर्षांचे मृत माकड आढळल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. पूर्वीच्या घटनेवेळी वनविभागास कळवूनही न आल्याने याची खबर आरोग्य विभागास देण्यात आली. कोणताही अधिकारी वा कर्मचारी न आल्याने ग्रामस्थांनाच त्यावर अंतिम संस्कार करण्याचे सांगण्यात आले. त्यामुळे सोयरसुतक नसलेल्या अशा अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

'कोरोना' व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची आज आवश्‍यकता असताना देखील अशा घटनांकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. आरोस वरचीआळी येथे शेतकरी महेश आरोसकर यांच्या काजु बागेत मृत माकड दिसून आले. गावात पूर्वी तीन माकड मृत सापडले होते. त्यावेळी वारंवार वनविभागास कळवूनही दखल न घेतल्याने आजच्या घटनेची खबर त्यांनी आरोग्य विभागास दिली ; परंतु निद्रावस्थेत तसेच बेजबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांनी यावेळी घटनास्थळी येणे टाळले व ग्रामस्थांनाच त्या मृत माकडाची विल्हेवाट लावण्यास सांगितले.

ग्रामीण भागाकडे कानाडोळा

त्यामुळे एकीकडे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य यंत्रणा अलर्ट करण्यात आली असली तरी ग्रामीण भागात मात्र त्याकडे कानाडोळा केला जात असल्याचे काजू बागायतदार महेश आरोसकर यांनी सांगितले. शेवटी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी देऊ परब व गोपाळ नाईक यांनी त्या मृत माकडाची विल्हेवाट लावली. वनविभागाशी संपर्क साधला असता, मृत माकडांची विल्हेवाट लावण्याचे सर्व अधिकारी ग्रामपंचायतला दिले आहेत. तरी सुद्धा आम्ही जवळपास असल्यास घटनास्थळी जात असल्याचे आजगाव वनपाल श्री. धुरी यांनी सांगितले. तसेच आरोग्य विभागाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT