fraud with fisherman in ratnagiri khed one person invest rupees 22 lakh in business
fraud with fisherman in ratnagiri khed one person invest rupees 22 lakh in business 
कोकण

या व्यवसायात नफा मिळतो म्हणत गुंतवणूक करण्यास भाग पाडले अन् २२ लाखाला घातली टोपी

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : तालुक्‍यातील भोस्ते येथे मासेमारीच्या व्यवसायात २२ लाखांची गुंतवणूक करण्यास लावून त्यानंतर गुंतवणूकदाराला कोणताही नफा न देता व पैसे परत देण्यास नकार देऊन त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फैय्याज हसन चौधरी (रा. मुंबई) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली.  

या प्रकरणी यासिन सोलकर (रा. उद्यमनगर), तबस्सुब सोलकर (रा. भोस्ते खेड) व निहाल सोलकर (रा. भोस्ते खेड) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. फिर्यादीत म्हटले आहे की, फैय्याज यांना मासेमारीच्या व्यवसायात २२ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास सांगून, तसेच तसे न केल्यास भोस्ते ग्रामपंचायतीजवळ बांधकाम प्रकल्पाचा करार रद्द करण्यात येईल, अशी धमकी संशयित आरोपींनी दिली होती.

या व्यवसायात चांगला नफा मिळतो, असे सांगून मासेमारीच्या बोट बांधणीच्या व्यवसायात २२ लाख रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर संशयित हे आजपर्यंत मासेमारीचा व्यवसाय करीत असून चौधरी यांनी गुंतवणूक केलेली २२ लाखांची रक्कम मागणी करूनही त्यांना दिली नाही. तसेच चौधरी यांनी पैसे मागताच त्यांना धमकी देण्यात येत असून सदर बोटीवर फिशिंग डिपार्टमेंटकडून ३७ लाखांचे कर्ज काढून सदर रक्कम आपल्या फायद्यासाठी वापरली आहे. या सर्व प्रकारात फसवणूक झाल्याबद्दल खेड पोलिस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली.

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: 48 तासांत मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यावर सुनावणी, कोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावून उत्तर मागितले

Gurucharan Singh: बेपत्ता झालेला गुरुचरण सिंग अखेर घरी परतला; म्हणाला, "मी धार्मिक प्रवासाला निघालो होतो..."

Stock Market: 20 मे रोजी मुंबईतील लोकसभा मतदानामुळे शेअर बाजार बंद राहणार का?

IPL 2024 MI vs LSG : मुंबई संघाच्या गोलंदाजीची दुर्दशा कायम;निकोलस पूरनच्या झंझावाती फलंदाजीमुळे लखनौच्या २१४ धावा

Latest Marathi News Live Update : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला बसची धडक 25 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT