मैत्री’ ने जपले रक्ताचे नाते sakal
कोकण

kokan : ‘मैत्री’ ने जपले रक्ताचे नाते

६० रक्तदात्यांचे रक्तदान; सामाजिक भावनेतून उपक्रम; गरजूंना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : मैत्री फाऊंडेशनने तिसऱ्यांदा रक्तदान शिबिराचे आयोजन करीत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय व प्रशासकीय अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तींचे एकमेकांशी रक्ताचे नाते जोडण्याचे पवित्र काम केले. ६० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य निभावताना पुढे केलेला मैत्रीरूपी हात आधार ठरतो आहे.

कोरोना काळातील मानवी रक्तांची वाढती आवश्यकता लक्षात घेऊन शहरातील मैत्री फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून २३ ऑक्टोबरला शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात महाड येथील जनकल्याण रक्तपेढीच्या मदतीने शिबिर आयोजित केले होते.

शिबिराचे उद्‌घाटन पोलिस निरीक्षक उत्तम पिठे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देविदास चरके, तायक्काँदो अॅकॅडमीचे प्रशांत सुर्वे, विश्वदास लोखंडे, काजल लोखंडे, विनोद जाधव, वैभव कोकाटे, मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज मर्चंडे, सखाराम मर्चंडे, बाळकृष्ण मर्चंडे आदींच्या उपस्थितीत झाले. उदय मर्चंडे, अभिषेक मर्चंडे, संकेत मर्चंडे, वैभव मर्चंडे, नयन मोरे, सुशांत मर्चंडे, नितेश मर्चंडे आदींनी जबाबदारी सांभाळली. त्या नागरिकांसाठी जीवनदान कोरोना काळात जाणवणारा रक्ताचा तुडवडा दूर करण्याच्या सामाजिक भावनेतून राबविलेला हा उपक्रम रक्ताची गरज भासणाऱ्या नागरिकांसाठी जीवनदान देणारा ठरतो आहे. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT