Ganesh idols 
कोकण

गणेशोत्सवाचे वेध! सिंधुदुर्गातील बाप्पा निघाले परदेशी

सकाळ वृत्तसेवा

यातील २५ गणेशमूर्ती यंदा आफ्रिका देशात रवाना झाल्‍या आहेत.

कणकवली (सिंधुदुर्ग): भारताप्रमाणेच विदेशातही धूमधडाक्यात गणेशोत्‍सव साजरा केला जातो. विदेशात प्रामुख्याने इको फ्रेंडली गणेशमूर्तीची मागणी असते. त्‍यामुळे खारेपाटण येथील हरेश पांचाळ आणि वेंगुर्लेतील विनय राजापूरकर यांनी खारेपाटण येथील गणेश चित्र शाळेत कागदी लगदा आणि मातीपासून तीन फुटाच्या गणेशमूर्ती तयार केल्या आहेत. यातील २५ गणेशमूर्ती यंदा आफ्रिका देशात रवाना झाल्‍या आहेत.

हरेश पांचाळ आणि विनय राजापूरकर यांनी गणेशमूर्ती आणि इतर कलाकुसरीच्या वस्तू तयार करून त्‍यांची ऑनलाईन विक्री करून रोजगाराचा मार्ग शोधला आहे. कोणताही पिढीजात वारसा नसतानाही हरेश आणि विनय या दोन मित्रांनी चार वर्षांपासून इको फ्रेंडली गणेशमूर्ती तयार करण्यास सुरूवात केली. त्‍यानंतर या मूर्ती ऑनलाइनच्या माध्यमातून विक्रीस उपलब्‍ध केल्या. यात चार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून चार मूर्तींची मागणी आली. त्‍याची पूर्तता केल्‍यानंतर आता विदेशातून इको फ्रेंडली गणेशमूर्तींची मागणी वाढल्‍याचे हरेश पांचाळ म्‍हणाले.

तीन फुटाची गणेशमूर्ती पूर्ण होण्यास एक महिन्याचा कालावधी जातो. तसेच समुद्रमार्गे या मूर्ती पाठवायच्या असल्‍याने गणेशोत्‍सवाच्या चार महिने आधीपासूनच विदेशातील गणेशमूर्ती तयार केल्‍या जातात. साधारणतः: वाहतूक खर्चाचा समावेश करून सुमारे ५० हजार रूपये एका गणेशमूर्तीसाठी आकारणी केली जात असल्‍याचेही पांचाळ म्‍हणाले.

गतवर्षी कोरोनामुळे देश विदेशातून गणेशमूर्तींची मागणी नव्हती. यंदा मात्र आफ्रिका देशातून २५ गणेशमूर्तींची मागणी आली आणि त्‍याची पूर्तताही तत्काळ करण्यात आली आहे.

- हरेश पांचाळ, मूर्तीकार, खारेपाटण

इको फ्रेंडली गणेशमूर्तीची मागणी वर्षभर असते. त्‍यामुळे चित्रशाळेत वर्षभर मूर्ती तयार होतात. याशिवाय विविध प्रकारचे शोपिस तयार करून त्‍याची विक्री करतो. या शोपिसला देश- विदेशातही मागणी आहे.

- विनय राजापूरकर, मूर्तीकार, वेंगुर्ले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident : शिर्डीला देवदर्शनाला जाताना काळाचा घाला! कंटेनरने दुचाकीला पाऊण किलोमीटर फरफटत नेलं, 30 वर्षीय डाॅक्टरसह तिघांचा दुर्दैवी अंत

MHADA: म्हाडा जमिनींचे सोने करणार, जाहिरातींसाठी जागा भाड्याने देणार

पोलिसांनी गळा पकडला, मारहाण अन् शिवीगाळ केली! आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसोबत भयानक घडलं; बोर्डाची चौकशीची मागणी

Kharif Season: खरीपपूर्वी शेतकऱ्यांना मोठा झटका! खतांच्या दरात मोठी वाढ, DAP-युरियाच्या तुटवड्याने चिंता वाढली

IAF Plane Crash हवाई दलाच्या विमानाचे लँडिंगनंतर दोन तुकडे, आगीचा भडका; ५ अधिकाऱ्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT