ratnagiri sakal
कोकण

गणेशोत्सवाने दिला एसटीला आर्थिक हात

२ कोटी ७१ लाखाचे उत्पन्न; १ हजार ०२९ गाड्याफेऱ्या

- राजेश शेळके

रत्नागिरी: कोरोना महामारीमध्ये एसटी महामंडळ मोठ्या आर्थिक संकटात सापडले होते. निर्बंध शिथिल झाल्यानंतर गणेशोत्सवाने एसटीला मोठा आर्थिक हात दिला आहे. गणेशोत्सवाच्या काळात सुमारे १ हजार २९ एसटी फेऱ्यांच्या माध्यमातून महामंडळाला २ कोटी ७१ लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. एसटीसाठी दीड वर्षांमध्ये सर्वांत मोठे उत्पन्न मिळवून देणारा हा गणेशोत्सव ठरला आहे.

कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर यंदा चांगल्या स्वरूपात गणेशोत्सव झाला. उत्सवासाठी यंदा जिल्ह्यात तब्बल १ लाख ९१६ मुंबईकर दाखल झाले. यामध्ये रेल्वेद्वारे ३१ हजार ९०, बसद्वारे २४ हजार ८५८, खासगी वाहनातून २२ हजार २९९, खासगी आराम बसने २२ हजार ६६९ लोक जिल्ह्यातील शहर आणि गावांमध्ये दाखल झाले होते. जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी १ हजार १०० एसटी बसेस मुंबईतून दाखल झाल्या होत्या. गणेशोत्सवात १४ सप्टेंबरपासून ते २२ सप्टेंबरपर्यंत जादा गाड्याचे नियोजन रत्नागिरी एसटी विभागातून करण्यात आले होते. १ हजार २९ गाड्या मुंबईला रवाना झाल्या. त्यामध्ये २५० ग्रुप बुकिंगच्या गाड्यांचा समावेश होता.

रत्नागिरी विभागाने यावर्षी प्रवाशांच्या मागणीनुसार त्यांच्या गावी एसटीची उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार २३० गाड्या गावातील मुंबईकरांसाठी सोडण्यात आल्या. एसटीच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुंबईकरांची गैरसोय दूर झाली.

गतवर्षी २००७ जादा गाड्या सोडण्यात आल्या होत्या; मात्र गतवर्षी प्रवासी क्षमतेपेक्षा निम्म्या प्रवासी वाहतुकीला परवानगी होती. त्यामुळे गतवर्षी जादा गाड्या गेल्या असल्या तरी यावर्षी गाड्या कमी असताना पूर्ण क्षमतेने भरून असल्याने एसटीच्या उत्पन्नात चांगलीच भर पडली. गतवर्षी कोरोनामुळे शासकीय निर्बंध कडक होते शिवाय मुंबईतून आलेल्या गाड्या थेट कोरोना केंद्रावर तपासणीसाठी नेण्यात येत होत्या.

त्यामुळे गतवर्षी आलेल्या गाड्यांची संख्या अत्यल्प होती तसेच लॉकडाउन काळात आलेल्या प्रवासी गणेशोत्सवानंतर मुंबईकडे रवाना झाले होते. यावर्षी शासकीय निर्बंध शिथिल असल्यामुळे येणाऱ्या तसेच जाणाऱ्या गाड्यांसाठी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. गेली दीड वर्षे मोठ्या आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाला गणेशोत्सवात २ कोटी ७१ लाखाचा मोठा आर्थिक हातभार लागला.

''गणेशोत्सवासाठी मुंबईतून १ हजार १०० गाड्या रत्नागिरी विभागात आल्या होत्या. प्रवाशांच्या मागणीनुसार परतीसाठी एसटीची उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार १ हजार २९ गाड्या मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. गतवर्षीपेक्षा यावर्षी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला असल्याने उत्पन्नात निश्चितच भर पडली आहे.''

- सुनील भोकरे, एसटी विभाग नियंत्रक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT