Ganpatipule temple closed but online see kokan marathi news 
कोकण

दीड वर्षाचा योग हुकणार; अंगारकीला गणपतीपुळे मंदिर  बंद,  दर्शन घ्या आता ऑनलाईन

राजेश कळबंटे

रत्नागिरी : कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी  2 मार्चला अंगारकी चतुर्थीला गणपतीपुळे देवस्थानने गणपती दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भक्त गणांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे असे आवाहन देवस्थान चे सरपंच डॉ.  विवेक भिडे यांनी केले आहे.
 सप्टेंबर 2019 नंतर आलेल्या अंगारकीला कोरोनामुळे भक्तगणांना दर्शन घेता आले नाही. त्यानंतर टाळेबंदी शिथिल झाली आणि मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली. परिणामी भक्तगण दर्शनासाठी गणपतीपुळेत दाखल होऊ लागले. परंतु चार महिन्यात पुन्हा कोरोनाने डोक वर काढलं आहे. शासनाने निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील सर्वात प्रसिद्ध अशी मंदिरे दर्शनासाठी काही काल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे. 


या परिस्थितीत दीड वर्षाने अंगारक योग येत असल्यामुळे या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध अशा गणपतीपुळेत श्रींच्या दर्शनाला प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. हा योग बऱ्याच दिवसांनी येणार असल्यामुळे एक लाखाहून अधिक भक्त येतील असा अंदाज आहे.

अंगारकीला सर्वाधिक पश्चिम महाराष्ट्रातील लोक गर्दी करतात. त्यामुळे अंगारकीच्या दिवशीची यात्रा, पालखी उत्सव देवस्थान ने रद्द करण्याचा निर्णय घेतला असून नियमित दर्शनासाठीही मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच भक्त गणांनी  ऑनलाईन दर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन दर्शन सुविधा पहाटे  3.30 वाजल्यापासून गणपतीपुळे देवस्थानच्या वेबसाइटवरून उपलब्ध करून देण्यात आली आहे. भक्त गणांनी ऑनलाईन दर्शन घ्यावे असे आवाहन डॉ. भिडे यांनी केले आहे. 


दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे गणपतीपुळे त येणारा वर्ग कमी झाला आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसायात मोठी घट झाल्याचे तेथील व्यापारी सांगत आहेत. गणपतीपुळेतील श्रींच्या ऑनलाईन दर्शनासाठी www.ganpatipule.co.in या वेबसाईटसह ऍपचा उपयोग करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Updates : पुण्याच्या गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित

Heart Health: अतिरिक्त मीठ सेवनाने विकारांचा वाढता धोका; उच्च रक्तदाब, हृदयरोग, मूत्रपिंड विकारांची जोखीम

Home Remedy For Cold: बदलत्या हवामानात सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतोय? मग आजीच्या 'या' देसी काढ्याने तुम्हाला त्वरित आराम मिळेल

Marathwada Rain: मराठवाड्यात घटले पावसाचे दिवस; गेल्यावर्षी २९, यंदा सोळाच दिवस

पत्नी प्रियकरासोबत पळून जायची, घटस्फोट मिळताच तरुणानं केली दुधानं अंघोळ; म्हणाला, मी स्वतंत्र झालो, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT