ganpatipule temple many people visited today in ratnagiri
ganpatipule temple many people visited today in ratnagiri 
कोकण

भाविकांसह, पर्यटकांच्या गर्दीने गणपतीपुळे समुद्रकिनारा फुलला

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : कोरोनाच्या भितीमधून पर्यटक पूर्णतः सावरले आहेत. त्यामुळे नऊ महिने ठप्प राहीलेल्या पर्यटन व्यावसायिकांना डिसेंबर, जानेवारी महिन्याला दिलासा मिळाला. जानेवारीच्या अखेरीस आलेल्या संकष्टी चतुर्थीला गेल्या दहा महिन्यातील उच्चांकी गर्दी गणपतीपुळेत झाली होती. दुपारपर्यंत साडेआठ हजाराहून अधिक भक्‍तगणांनी दर्शन घेतले. शनिवार, रविवार जोडून आलेल्या सुट्ट्या पथ्थ्यावर पडल्या आहेत. कोरोनावरील लस दाखल झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांचे ग्रुपही फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. 

गणपतीपुळे पर्यटन स्थळ अनेकांचे श्रध्दास्थान आहे. गणरायाच्या दर्शनाबरोबरच अथांग किनाऱ्यावर फिरण्याची मौजमजा पर्यटकांना एकाच ठिकाणी घेणे शक्‍य होते. त्यामुळे दोन दिवसाच्या सुट्‌टीत पर्यटनासाठी येणाऱ्यांकडून गणपतीपुळेला पसंती दिली जाते. कोरोनामुळे नऊ महिने ठप्प राहीलेल्या पर्यटन व्यावसायाला नोव्हेंबरच्या अखेरीस चालना मिळाली. गेल्या सव्वा दोन महिन्यात दररोज पाच ते सहा हजार पर्यटक सुट्ट्यांचे नियोजन करुन येत होते.

ख्रिसमसच्या सुट्टीत पहिले तीन दिवस चांगला प्रतिसाद मिळाला. पुन्हा उतरती कळा लागली. पुढे कमी - अधिक प्रमाणात पर्यटकांची रेलचेल सुरु होती; परंतु रविवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीला गणरायाला साकडे घालण्यासाठी अनेक पर्यटकांनी हजेरी लावली होती. दुपारी तीन वाजेपर्यंत गणपतीपुळे मंदिरात दर्शन साडे आठ हजार पर्यटकांची नोंद झाली. रात्री चंद्रोदयापर्यंत सुमारे पंधरा हजारांवर पर्यटक नोंदण्यात आले. कोरोना नंतरच्या काळात एवढी गर्दी प्रथमच झाल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

कोरोनावरील लसीकरण मोहीम सुरू झाल्यामुळे हा परिणाम आहे. शनिवार, रविवारी आलेल्या जोडून सुट्ट्या पर्यटकांच्या पथ्थ्यावर पडल्या आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, शेगाव, सिंधुदुर्गसह मुंबई, पुण्यातील सर्वाधिक पर्यटकांनी येथे दर्शनासाठी गर्दी केलेली होती. काही बेळगावमधील ग्रुपही फिरण्याच्या निमित्ताने आल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले.

एसटी, रेल्वेपेक्षाही खासगी वाहनांवर लोकांचा सर्वाधिक भर होता. त्यामुळे वाहतूक कोंडीही ठिकठिकाणी होत होती. दर्शनासाठी मंदिर परिसरात येताना मोरया गेटवरील सुरक्षारक्षक मास्क लावण्याचा आग्रह धरत होते. सकाळी 7 वाजता दर्शनाला सुरवात झाली. पर्यटकांच्या गर्दीचा फायदा हॉटेल, फेरीवाले, शहाळी विक्रेते, किनाऱ्यावरील जलक्रीडा व्यावसायिक यांच्यासह निवास व्यवस्था करणाऱ्यांना 70 टक्‍के प्रतिसाद मिळाला. 

"कोरोनातील नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर प्रथमच प्रचंड गर्दी गणपतीपुळे झाली होती. तरुणांबरोबरच ज्येष्ठांचेही ग्रुप धार्मिक स्थळांवर फिरण्यासाठी बाहेर पडलेले आहेत."

- प्रमोद केळकर, हॉटेल व्यावसायिक 

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT