चिपळूण (रत्नागिरी) : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनी व त्यांच्या वसाहतीत कोरोनाचा विळखा घटत झालेला असतानाच विनती कंपनीतही कोरोनाचा शिरकाव झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी रात्री प्राप्त अहवालानुसार दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असून त्यातील एकजण विनती कंपनीतील कामगार असल्याची माहिती समोर आली आहे.
खेड तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून कोरोनाबाधितांची संख्या 329 वर पोहचली आहे. यातील सर्वाधिक कोरोनाबाधित घरडा कंपनीशी संबंधित असून तब्बल 195 जणांचा समावेश आहे. 145 कोरोनाबाधित कामगाराचा समावेश असून त्यांच्या कुटुबातील 50 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यातील आतापर्यंत 14 जणांनी कोरोनावर मात केली आहे. लोटे औद्योगिक वसाहतीतील घरडा कंपनी कोरोनाच्या विळख्यात अडकल्याने नजीकचे ग्रामस्थ कमालीचे धास्तावले आहेत.
घरडा कंपनीतील कोरोनाबाधितांची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. एकीकडे घरडा कंपनीतील कोरोना बाधिताची संख्या झपाट्याने वाढत असताना विनती कंपनीतही कोरोनाचा शिरकाव झाल्याने कंपनी व्यवस्थापनासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. या कंपनीत कार्यरत असलेल्या व चिपळूण येथे वास्तव्यास असलेल्या एका कामगाराचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय धामणदेवी येथील एका रूग्णांचा समावेश आहे. दोन्ही कोरोनाबाधितांच्या कुटूंबातील सदस्यांसह संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेण्याच्या हालचाली सुरू होत्या.
संपादन - अर्चना बनगे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.