Gharda to conduct high level inquiry into blast at Chemical factory Minister of State for Industry Aditi Tatkare kokan news 
कोकण

घरडा केमिकल्स कारखान्यातील स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करणार : आदिती तटकरे यांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी :  चिपळूण तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील "घरडा केमिकल्स" या केमिकल उत्पादक कंपनीत काल झालेल्या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर जखमी आहे.  त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे पाठविण्यात आले. या दुर्घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून सखोल चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा उद्योग राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केली आहे.  त्याचबरोबर दुर्घटनेतील पीडित कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचेही त्यांनी सांगितले.

या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी 55 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे घरडा केमिकल्स तर्फे सांगण्यात आले असून जखमी कामगाराच्या उपचारासाठी वीस लाख रुपये देण्याचेही कंपनीने जाहीर केले आहे.

या दुर्दैवी घटनेची गंभीर दखल राज्यस्तरावर घेण्यात आली असून भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी तातडीने औद्योगिक सुरक्षेच्या कारणास्तव आवश्यक त्या सर्व उपाययोजनांचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी गरज आहे, अशा ठिकाणी औद्योगिक सुरक्षा उपाययोजना तात्काळ राबविण्यात येतील, असेही राज्यमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांनी सांगितले आहे.  

संपादन- अर्चना बनगे              

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baramati By-Election : मोठी बातमी ! बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार, मल्लिकार्जून खर्गेंचे शरद पवार यांना आश्वासन

Shevta Mahadev Temple : जायकवाडी धरणाच्या लाटांखाली 54 वर्षे हरवलेला वारसा पुन्हा जिवंत होणार; शेवता ग्रामस्थांनी घेतला मोठा निर्णय, 'हेमाडपंथी' वैभव परतणार!

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक प्रकार; पिण्याच्या पाण्यात अळ्या आढळून नागरिक हैराण

Satara News : ‘स्थानिक स्वराज्य’मध्ये महायुतीची कसोटी; सातारा- सांगली विधान परिषदेसाठी नव्या समीकरणांची नांदी; झेडपी निवडणुकीनंतर बदलली गणिते?

IPL 2026: फक्त १ धावेने सामना जिंकल्यानंतर शुभमन गिलला BCCI ने सुनावली शिक्षा; DC vs GT सामन्यात काय झाली चूक?

SCROLL FOR NEXT