Give answer to Illegal Fisherman in your style Sadabhu Khot Advice  
कोकण

बेकायदा मच्छीमारी करणाऱ्यांना तुमच्या स्टाईलने उत्तर द्या - सदाभाऊ खोत

सकाळवृत्तसेवा

दाभोळ ( रत्नागिरी) - बेकायदेशीरपणे मच्छीमारी करणाऱ्यांच्या बंदरात उभ्या असलेल्या बोटींना तुमच्या स्टाईलने उत्तर द्या, असा सल्ला माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मच्छीमार नेत्यांना दिला. गेले चार दिवस दापोली तहसील कार्यालयासमोर मच्छीमारांचे एलईडी मच्छीमारी बंद करा, या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची भेट घेण्यासाठी तसेच त्यांना पाठिंबा देण्यासाठी सदाभाऊ खोत दापोली येथे आले होते. 

किसान भवन येथे पत्रकार परिषदेत ते म्हणाले, कोरोनामुळे सरकार सर्वांना घरी बसा, असे सांगत आहे. त्यांना पगार मिळत आहे. जर घराबाहेर पडला नाही तर हातावर पोट असणारा सामान्य माणूस खाईल काय ? जर कोरोनाच्या काळात सर्वांनी घरी बसायचे असेल तर प्रत्येक कुटुंबप्रमुखाला किमान बॅंकेच्या शिपायाला जेवढा पगार मिळतो तेवढे पैसे सरकारने द्यावेत.

शेतकरी व मच्छीमार बांधव यांनी हातात हात घेऊन काम केले पाहिजे. मच्छीमारांनी त्यांच्या मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभर आंदोलन केले पाहिजे. शेतकरी, मच्छीमारांच्या समस्यांबाबत मच्छीमारांच्या पदाधिकाऱ्यांसह मंगळवारी (ता. 30) राज्यपालांची भेट घेणार असून एलईडी मासेमारीला आळा घालावा, अशी मागणीही करणार असल्याचे खोत यांनी सांगितले. 

आंदोलनासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्रालयात मत्स्यव्यवसाय मंत्री यांच्या दालनात अधिकारी व लोकप्रतिनिधी, मच्छीमार प्रतिनिधीची बैठक आहे, ती दापोली येथे घेणे गरजेचे होते, असेही खोत यांनी सांगितले. 

शेतकरी, मच्छीमारांचे आभार 
कोरोनाच्या कालावधीत शेतकरी व मच्छीमार यांनी देशभरातील जनतेच्या भुकेचा प्रश्‍न सोडविला. या काळात जर शेतकरी शेतात गेला नसता तर अन्न कोणी पिकविले असते तसेच मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी गेला नसता तर जनतेला मासे कसे मिळाले असते, त्यामुळे सर्वांनी शेतकरी व मच्छीमारांचे आभार मानले पाहिजेत, असे सांगितले. 

खोत यांनी मारला टोला 
जे राज्यातील जनतेला घराबाहेर पडू नका, असे सांगत होते व स्वत:ही घराबाहेर पडत नव्हते. त्यांच्या लेकराला व व पत्नीलाही कोरोनाचा प्रादुर्भाव झाला, असा टोलाही खोत यांनी कोणाचे नाव न घेता मारला. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर रात्री दीडलाच का केला हल्ला? CDS चौहानांचा 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठा खुलासा; म्हणाले, 'पहिली अजान...'

MLA Bachchu Kadu: अन्यथा भाजपचा बॅलेट कोरा करणार: आमदार बच्चू कडू; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाच काय झालं

Latest Marathi News Updates : मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; पोलिसांचा कडक तपास सुरु

Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?

'अरे ही तर म्हातारी...' शाहरुखच्या होणाऱ्या सूनेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, आर्यनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT