कोकण

सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एकांकिकेला सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा

मालवण - मुंबई विद्यापीठाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सवात येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या "निर्वासित' या एकांकिकेने प्रथम क्रमांक मिळवित सुवर्णपदक पटकाविले. याचबरोबर पुरूष व स्त्री अभिनयातही प्रथम क्रमांक पटकाविला. सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच एवढे मोठे यश लाभले आहे. 

या एकांकिकेचे लेखन स्वप्नील जाधव, दिग्दर्शन गणेश गावकर, नेपथ्य रूपेश नेवगी, नेपथ्य सहाय देवेन कोळंबकर, श्रीरंग करवडकर, संगीत अक्षय दागंट, संगीत संयोजन पंकज गावडे यांनी दिले आहे तर यात वैभव वळंजू, प्रथमेश सामंत ललित चव्हाण, जान्हवी बिरमोळे, स्नेहा चव्हाण, विजय पेडणेकर, भूषण माने आदी कलाकार सहभागी झाले होते.

महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. एस. पी. खोबरे यांनी महोत्सवाची जबाबदारी सांभाळली. सांस्कृतिक विभागाचे सर्व सहकारी, प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तसेच मालवणातील नाट्यरसिकांचे सहकार्य लाभले. सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT