gram panchayat election the reservation of sarpanch disputes to party in guhagar ratnaigiri 
कोकण

निवडणूक परवडली, पण सरपंचपद नको ; सरपंचपदाचे आरक्षण वादांना तोंड फोडणारे

मयूरेश पाटणकर

गुहागर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील २९ ग्रामपंचायतींपैकी सुमारे १५ ते १६ ग्रामपंचायती बिनविरोध होतील; मात्र सरपंचपदाचे आरक्षण निश्‍चित झाल्यावर गावात सर्वानुमते सरपंचपदी एखाद्या व्यक्तीस बसविण्यात अनेक अडचणी येणार आहेत. त्यामुळे काही ग्रामपंचायतींची सरपंचपदे रिक्त राहू शकतात, अशी भीती भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी व्यक्त केली.

गुहागर तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे सर्वाधिकार येथील राजकीय पक्षांनी संबंधित गावातील कार्यकर्त्यांकडे सोपविले. गावपातळीवर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भेटी घेतल्या; मात्र यामध्ये पक्षीय अभिनिवेश नव्हता. स्थानिक पातळीवरील निर्णय मान्य होतील. फक्त आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देऊ नका, अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. त्यामुळे बहुतांशी ग्रामपंचायतीमधील निवडणुकांचे निर्णय गावपातळीवर झाले आहेत.

पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता सरपंच बनला तरच तिथे आमची सत्ता असेल, असे आम्ही सांगू, अशी भूमिका भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी ‘सकाळ’जवळ बोलताना व्यक्त केली; मात्र सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायत सदस्य निवडून झाल्यावर पडणे, हा निर्णय अडचणीचा आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले की, सरपंचपदाचे आरक्षण आधी निश्‍चित न झाल्याने अनेक रथी महारथी आधीच निवडणूक प्रक्रियेतून बाजूला झाले. ही चांगली गोष्ट झाली, परंतु निवडून आलेल्या सदस्यांमधून सरपंचपदासाठी निश्‍चित झालेल्या आरक्षणाच्या उमेदवाराची निवड करणे, ही गोष्ट आळीपाळीने सरपंच पद वाटून घेणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी अडचणीची ठरणार. त्यातून सरपंचपद रिक्त राहणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या 
वाढेल.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर हीच खंत व्यक्त करताना म्हणाले, ‘‘ग्रामपंचायत सदस्यांमध्ये क्षमतावान सदस्य निवडून आला असला तरी सरपंचपद आरक्षण दुसऱ्याला पडले तर विकासासाठी ते अडचणीचे होईल. विशेषत: निवडणुका झालेल्या गावांमध्ये अल्प मतातील पॅनेलचा सरपंचही निवडून येईल. अशावेळी ग्रामपंचायतीत रोज वादांना तोंड फुटेल.’’

निवडणूक परवडली, पण सरपंचपद नको

भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे म्हणाले, ''सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्यावर प्रत्येक पक्ष आरक्षण योग्य उमेदवाराला आपले लेबल लावण्यासाठी चढाओढ सुरू होणार आहे. त्या वेळी निवडणूक परवडली, पण सरपंचपद नको, असे म्हणण्याची वेळ ग्रामपंचायत सदस्यांवर येईल.''

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT