Groyan At Mirya Beach To Restrict Erosion Ratnagiri News 
कोकण

समुद्र किनाऱ्याची धूप थांबविण्यासाठी  "हे' तंत्र 

राजेश कळंबटे

रत्नागिरी - समुद्राच्या वेगवान लाटांमुळे मिऱ्या किनाऱ्याला निर्माण झालेल्या धोक्‍यावर "ग्रोयन' तंत्राचा उतारा शोधून काढण्यात आला आहे. त्यासाठी 189 कोटी 67 लाख रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला आहे. पुण्याच्या मोर्नाच कंपनीला कन्स्लटंट म्हणून नेमण्यात आले आहे. बंधाऱ्याचे काम पत्तन विभागाकडून केले जाणार असून पूर्ण होण्यासाठी किमान चार वर्षे लागतील. 

मुरुगवाडा, पांढरा समुद्र, पंधरामाड ते मिऱ्या (मोर टेंबे) असा साडेतीन कि. मी. चा बंधारा या ठिकाणी बांधण्यात येणार आहे. मिरकरवाडा टप्पा 2 च्या कामामुळे समुद्राच्या लाटा मिऱ्या किनाऱ्यावर धडकत आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील हजारोंच्या संख्येने वसलेल्या ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे.

आतापर्यंत सुमारे तीस ते चाळीस कोटी रुपये येथील सुरक्षेसाठी खर्ची घालण्यात आले आहे. तेरा कोटी रुपये खर्च करून मेरीटाईम बोर्डाकडून बांधलेला दगडी बंधारा लाटांच्या तडाख्यात वाहून जाऊ लागला आहे. ठिकठिकाणी भगदाड पडले असून दगडही वाहून जात आहे. कायमस्वरुपी उपायोजना म्हणून पुण्याच्या खडकवासलातील सेंट्रल वॉटर रिसर्च पॉवर स्टेशनतर्फे काही महिन्यांपूर्वी अभ्यास करण्यात आला. त्यानंतर ग्रोयन पद्धतीचा वापर करून तिथे बंधारा उभारण्याचा निर्णय झाला आहे.

साडेतीन कि. मी. च्या मुख्य बंधाऱ्याला दोन टनी टेट्रापॉडच्या रांगा टाकण्यात येणार आहेत. बंधाऱ्यावर येणाऱ्या लाटांचा जोर कमी करण्यासाठी बंधाऱ्यापासून शंभर मीटर आतमध्ये बारा ते तेरा टेट्रॉपॉडच्या सहा मीटर जाडीच्या भिंती घालण्यात येणार आहेत. यालाच ग्रोयन तंत्र म्हटले जाते. या पद्धतीमध्ये बंधाऱ्यापासूनचा भाग काही मीटर अंतरापर्यंत कमी जाडीचा असेल, तर त्याचा पुढील भाग 60 मीटर लांबीचा ठेवला जाणार आहे.

साडेतीन कि. मी. लांबीच्या बंधाऱ्यावर बारा ग्रोयन टाकले जाणार आहेत. दोन ग्रोयनमधील अंतर तीनशे ते पाचशे मीटर ठेवले जाईल. हे ग्रोयन पूर्णतः टेट्रापॉड टाकून तयार केले जातील. मुख्य बंधाऱ्याचे दगड साडेसहा मीटर खोल टाकून पाया मजबूत करण्यात येणार आहे. ग्रोयन बनवतानाही वाळूत खोदून टेट्रापॉड टाकण्यात येतील. ग्रोयनचा पुढील भाग विस्तारित असल्यामुळे लाटा त्यावर आपटत राहतील. लाटांबरोबर येणारी वाळू दोन ग्रोयनच्या मधील मोकळ्या जागेत साचून राहील. हळहळू वाळू साचून तेथील भाग भरुन जाणार आहे. 

संयुक्‍त पाहणी केली जाणार 

ग्रोयन तंत्र मिऱ्याच्या सुरक्षेसाठी उपयुक्‍त ठरेल, असा दावा पत्तन विभागाने केला आहे. पंधरा दिवसात मिऱ्या येथील संयुक्‍त पाहणी केली जाणार आहे. बंधाऱ्याच्या बाजूने सहा मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. 

बंधाऱ्यासाठी लागणारा निधी 

* बंधाऱ्यासाठी एकूण निधी 189 कोटी 67 लाख 
* साडेतीन किमीच्या मुख्य बंधाऱ्यासाठी 75 कोटी 26 लाख 
* बारा ग्रोयनसाठी 75 लाख 34 लाख 
* अभ्यासासाठी 25 लाख 

सीआरझेडचा अडथळा 

मुख्य बंधाऱ्यापासून समुद्रात आतमध्ये शंभर मीटर अंतरावर टेट्रापॉड टाकून ग्रोयन टाकण्यात येणार आहेत. त्याला सीआरझेडचा अडथळा आला तर हा प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत अनेक प्रकल्प याच परवानगीत अडकले आहेत.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' नशेत धुंद मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT