Guhagar Municipal Panchayat New Garbage Collection Kokan Marathi News 
कोकण

गाडीवाला आया जरा कचरा निकाल म्हणत गुहागरमध्ये कचरा संकलनाचा दबदबा....

सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक गतीने होण्यासाठी गुहागर नगरपंचायतीने स्वमालकीच्या तीन कचरा संकलन वाहनांची खरेदी केली. या वाहनांचा लोकार्पण सोहळा प्रजासत्ताक दिनी झाला. तसेच प्लास्टिकचा वापर थांबविण्यासाठी प्रत्येक घरपट्टीधारकाला दोन कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची प्रातिनिधिक स्वरूपात सुरवात करण्यात आली. 

गांधी चौकात नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी ध्वजवंदन झाले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक गजानन बेंडल, एकनाथ रहाटे आणि नंदकुमार पाटील यांच्या हस्ते नव्याने आलेल्या कचरा संकलन गाड्यांचे पूजन करण्यात आले. लोकार्पण कार्यक्रमानंतर स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या घंटा गाड्या व मतदान जागृतीचा संकेत देणारे फलक लावलेली गाडी यांनी पोलिस कवायत मैदानातील संचलनात भाग घेतला. या तीन वाहनांसांठी घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पातून २० लाखांचा निधी देण्यात आला आहे.

बचतगटांच्या हातालाही काम

सुका कचरा आणि ओला कचऱ्यासाठी दोन स्वतंत्र कप्प्याची रचना केली आहे. नगरपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना घंटागाडीत कचरा ओतावा लागत होता. नव्या वाहनांमध्ये नागरिकांना सहजतेने कचरा टाकता येणार आहे. या वर्षी प्रत्येक घरपट्टीधारकाला २ मजबूत आणि मोठ्या कापडी पिशव्यांचे वाटप करण्याचा निर्णय नगरपंचायतीने घेतला आहे. त्यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे कापडी पिशव्या खरेदी करण्यात आल्या. या पिशव्या बचतगटांद्वारे घरोघरी पोच करण्याची यंत्रणा नगरपंचायत उभी करणार आहे. या उपक्रमाची सुरवात प्रजासत्ताक दिनी करण्यात आली. पाच घरपट्टीधारकांना पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 

प्लॅस्टिक बंदीला पर्याय घरात दोन कापडी पिशव्या...
नगराध्यक्ष राजेश बेंडल म्हणाले, कचरा संकलनासाठी यापूर्वी स्वमालकीची १ व भाडेतत्त्वावर घेतलेली १ अशा दोन घंटागाड्या वापरत होतो. त्यामुळे शहरातील कचरा संकलनाचे वेळापत्रक सांभाळताना सफाई कामगारांची धावपळ होत असे. आता तीन घंटागाड्यांमुळे शहरातील कचऱ्याचे संकलन सुरळीत होईल. प्लॅस्टिक बंदीचा निर्णय आधीच घेतला होता. परंतु या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होत नव्हती. आता प्रत्येक घरात दोन कापडी पिशव्या दिल्याने प्लॅस्टिक बंदीबाबत कठोर पावले उचलली जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Research : शुभांशु शुक्लांनी अंतराळात केला थरारक प्रयोग! बनले 'या' खास गोष्टीवर संशोधन करणारे पहिले भारतीय..

Nagpur Fraud: खोट्या रजिस्ट्रीच्या आधारे उचलले ३८ लाखांचे गृहकर्ज

Pune News : रस्त्याच्या मधोमध झाडामुळे अपघाताचा धोका; प्रयेजा सिटी सोसायटी परिसरातील स्थिती, जवळच शाळा असल्याने चिंता

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

Pune News : नानासाहेब पेशवेंच्या समाधीची दुरवस्था; परिसरात कचऱ्याची समस्या; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक वारसा उपेक्षित

SCROLL FOR NEXT