Fishing Sakal media
कोकण

गुहागर : RGPPL करतेय मत्स्यशेती

तलावात तिलापियाचे उत्पादन; अनेक चांगले उपक्रम सुरू

- मयूरेश पाटणकर

गुहागर: वापरात नसलेल्या जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला आहे. तिलापिया माशांचे उत्पादन कंपनीने घेतले आहे. मत्स्यशेतीच्या यशस्वी प्रयोगातील अनुभवाचा उपयोग करून परिसरातील ग्रामस्थांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी कंपनी आगामी काळात प्रयत्न करेल, असा विश्वास कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता यांनी व्यक्त केला.

गेले दोन महिने आरजीपीपीएलमधील वीज उत्पादन बंद आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्याने कंपनीवर स्थानिकांचा, लोकप्रतिनिधींचा दबाव वाढतोय. अशा नकारात्मक परिस्थितीतही पर्यावरण रक्षण, पर्यावरण संवर्धन, संसाधनाचा योग्य वापर यासाठी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता आग्रही आहेत. या प्रकल्पावर त्यांची नियुक्ती झाल्यानंतर सामंता यांनी आरजीपीपीएल निवासी वसाहतीमध्ये विविध वृक्षांची लागवड केली. किचन गार्डनसाठी आग्रह धरला. स्वच्छता, प्लास्टिकमुक्त परिसरासाठी सर्वांना प्रेरित केले. आरजीपीपीएल प्रकल्पांतर्गत पर्जन्यजल साठवून (रेनवॉटर हार्वेस्टिंग) अधिकतम वापर कंपनीसाठी केला. याच मोहिमेचा भाग म्हणून डिसेंबर २०२१ मध्ये मत्स्यशेतीचा प्रयोगही कंपनीमध्ये करण्यात आला.

कंपनीच्या परिसरातील एक जलतरण तलाव कित्येक वर्षे वापराविना पडून होता. स्थापत्य विभागाच्या कर्मचाऱ्यांतर्फे त्यांची देखभाल ठेवली जात असे. सामंता यांनी या विभागाला जलतरण तलावात मत्स्यशेतीचा प्रयोग करण्याची विनंती केली. मत्स्यशेतीतज्ज्ञ डॉ. श्रीधर देशमुख यांची या प्रयोगासाठी मदत घेण्यात आली. १ डिसेंबर २०२१ ला तिलापिया जातीच्या माशांचे २ हजार मत्स्यबीज या तलावात सोडण्यात आले. डॉ. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य विभागाचे काही कर्मचारी मत्सखाद्य पुरवणे, तलाव स्वच्छ राहील असे पाहणे, तलावातील पाणी बदलणे आदी कामे करत होते. गेल्या सहा महिन्यांत उत्पादनयोग्य माशांची वाढ तलावात झाली आहे. कंपनीतील अनेक अधिकारी, कर्मचारी मत्स्यशेतीचा यशस्वी प्रयोग पाहण्यासाठी या तलावाला भेट देत आहेत.

कर्मचारी अनुभवसंपन्न

या प्रयोगाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी असीमकुमार सामंता म्हणाले की, मत्स्यशेतीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना यापूर्वीच तयार केली आहे. मत्स्यशेतीच्या प्रयोगातून आमचे कर्मचारी अनुभवसंपन्न झाले आहेत. मत्स्यशेती करू इच्छिणाऱ्या गावकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा आत्मविश्वास त्यांच्याकडे आहे. याचा फायदा कंपनी परिसरातील गावकऱ्यांनी करून घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT