hacked whatsapp return in konkan sim card deactivate 
कोकण

हॅक झालेलं WhatsApp आठ दिवसात मिळवलं परत; सीमकार्ड ठेवलं बंद

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : हॅकरच्या ताब्यातून व्हॉट्‌सॲप अकाउंट परत मिळवायचे होते. बऱ्याच शक्‍यतांवर विचार केला, काही आराखडे बांधले. सीमकार्ड डीॲक्‍टिव्हेट ठेवले. जेणेकरून हॅकरला पुन्हा व्हॉट्‌सॲपचा ताबा मिळू नये. व्हॉट्‌सॲपकडेही तक्रार दाखल केली. आठ दिवसांतच तयार केलेली हॅकिंग रिकव्हरी प्रोसेस व प्लॅनिंग यशस्वी झाले. सीमकार्ड ॲक्‍टिव्हेट करून व्हेरिफिकेशन पूर्णपणे युजरकडे दिले. अशा प्रकारे हॅक झालेले व्हॉट्‌सॲप अकाउंट युजरला परत मिळाले, अशी माहिती आयटी सल्लागार व वेब डिझायनर वैभव डोंगरे यांनी दिली.

हॅक झालेले व्हॉट्‌सॲप पुन्हा मिळवण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागला. अनेक तांत्रिक अडचणींचा सामनाही करावा लागला. डोंगरे म्हणाले की, व्हॉट्‌सॲप ही एक हायली ऑटोमेटेड व खूप कॉम्प्लेक्‍स सिस्टिम आहे. त्यामुळे रिकव्हरीसाठी उचलले जाणारे एखादे चुकीचं पाऊल आपल्यालाच अडचणीत आणू शकते. कारण सिस्टिमला काही नियम सेट केलेले असतात. त्या नियमांच्या आधारे सिस्टिम हॅकर व ओनर ठरवते. या सगळ्याचा विचार करून हॅकरच्या हातात गेलेले अकाउंट परत मिळवण्यासाठी एक प्लॅन आखला. एक प्रॉपर हॅकिंग रिकव्हरी प्रोसेस तयार करण्यात आली. यात सुद्धा काही शक्‍यता होत्या, की ज्यामुळे हे अकाउंट कायमच हॅकरच्या ताब्यात गेले असते.

हॅकिंगपासून बचाव कसा कराल?
    

  • मोबाईल अनोळखी माणसाच्या हातात अजिबात देऊ नका.
  • आपल्या व्हॉट्‌सॲपला टू स्टेप व्हेरिफिकेशन असावे.
  • फोनवर येणाऱ्या ऑफर्स किंवा नोटिफिकेशन्सबाबत सावध.
  • १० मिनिटे विचार करायला किंवा खात्री करायला घ्या. 
  • चोर किंवा हॅकर असेल तर तो शक्‍यतो थांबणार नाही.
  • हॅकरकडे रोज नवीन-नवीन युक्‍त्या असतात. 
  • गुगल प्ले स्टोअरवरून ॲप इन्स्टॉल करताना त्या ॲपचे कार्य काय, हे पाहावे.
  • पब्लिशर कोण, इंस्टॉलेशन्स किती, वापरकर्त्यांच्या कंमेंट्‌स हे पाहून ॲप इन्स्टॉल करा.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

Archana Kute: 'ज्ञानराधा मल्टिस्टेट'च्या अर्चना कुटेंना पुण्यातून अटक; छाप्यात काय-काय सापडलं?

Nude Party: न्यूड पार्टीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल; संशयित आयोजकांना अटक

SCROLL FOR NEXT