heavy rain in ratnagiri mandangad 
कोकण

मंडणगडमध्ये मुसळधार श्रावणसरी बरसल्या ; तब्बल एवढ्या पावसाची नोंद

सचिन माळी

मंडणगड : 'श्रावणात घन निळा बरसला....' या ओळींचा प्रत्यय येणाऱ्या श्रावणसरींची मुसळधार मंडणगड तालुक्यात सुरू आहे. आज दिवसभरात मंडणगड १६५ मिमी, म्हाप्रळ १२० मिमी व देव्हारे १७० मिमी अशा तीन मोजणी केंद्रात एकूण ४५५ मिमी पाऊस झाला आहे. त्याची सरासरी १५१ मिमी राहिली असून तालुक्यात एकूण २०१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

श्रावण महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने दडी मारली होती. तालुक्यात काही ठिकाणी तुरळक सरी येत होत्या. मात्र दोन दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केली आहे. काल रात्री २ वाजल्यापासून वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार सुरु असून पावसाचा हा जोर कायम आहे.

लावणी केलेली भाताची आणि नाचणीची रोपे तरारली असल्याने शेत हिरवीगार दिसत आहेत. जंगली श्वापदांचा शेतातून उपद्रव सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी विविध शक्कल लढविण्यास सुरवात केली. शेतातून बुजगावणी, चित्रविचित्र आवाज काढणाऱ्या दोऱ्या, रंगीबेरंगी साड्यांचे कुंपण घातल्याचे चित्र दिसत आहे. मुसळधार पावसासह वाऱ्याच्या वेगामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. 

कोरोना आणि लॉकडाउनमुळे गावोगावी मुंबईकर अडकून पडले आहेत. त्यातील अनेकांनी आपली पावले पुन्हा शेताकडे वळवली असल्याने यावर्षी शेती लागवडीचे क्षेत्र वाढले आहे. अनेक ओस पडलेल्या खलाट्या लावणी केल्याने पुन्हा हिरव्यागार दिसू लागल्या आहेत. शेतात वाढलेल्या गवत काढणीचे काम सुरू असून अनेक शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावरील गवत मारण्यासाठी पंपाच्या सहाय्याने औषधांची फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील भारजा, निवळी या प्रमुख नद्यांसह आसपासच्या गावातील धबधबे, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. श्रावणातील निसर्गाचे रूप हळूहळू बदलत असून पाऊस, ऊन, वारा, धुकं यांचा एकत्रित मिलाप होताना दिसत आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विधानसभेनंतर महाराष्ट्रात १५ लाख नवमतदार वाढले, एकही आक्षेप नाही; बीएमसीत एकूण मतदार पोहोचले १ कोटीच्या वर

Deputy Chief Minister Ajit Pawar: राहुल गांधींच्या आरोपात तथ्य नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार; 'हरल्यावरच ईव्हीएमची आठवण येते, जिंकल्यावर नाही'

Latest Marathi News Updates : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार महेश राखचा खून करून संशयितांचे मिरजेकडे पलायन

Nandurbar News : नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांची आदर्श कृती; जुळ्या मुलांचा सरकारी शाळेत प्रवेश, पाहा व्हिडिओ

Asia Cup 2025 : अफगाणिस्तानविरुद्ध सामना सुरू असतानाच वडिलांचं निधन, श्रीलंकेच्या खेळाडूवर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT