Heavy rain in Sangameshwar taluka 
कोकण

संगमेश्वर तालुक्यात मुसळधार पाउस....

प्रमोद हर्डीकर

साडवली - आधीच कोरोनाचे भय त्यात वाढत्या उष्म्याने हवालदील झालेल्या नागरीकांना रविवारी संध्याकाळी अवकाळी पावसाने दिलासा दिला.संगमेश्वर तालुक्यात एक तास मुसळधार पाउस बरसला.गेले दोन दिवस उष्मा वाढला होता.दोन दिवस पावसाने हुलकावनी दिली होती.रविवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि चार वाजता ढगांचा कडकडाट होवून मुसळधार पाउस बरसला.अचानक आलेल्या या पावसाने देवरुख बाजारपेठेत नागरीकांची व व्यापारी वर्गाची चांगलीच धावपळ झाली.

कोरोनाचा प्रभाव असुनही रविवारी देवरुख बाजारपेठेत कमालीची गर्दी झाली होती.ही गर्दी दुपारनंतर ओसरली होती.त्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावली.
संगमेश्वर तालुक्यात या पावसाने चिंगली हजेरी लावली.काही भागात शेतकर्‍यांनी आपल्या पेरण्या उरकुन घेतल्या होत्या त्यांना या पावसाचा चांगला फायदा होणार आहे.लाॅकडाउनच्या काळात शेतकरी वर्गाने शेतीची कामे आटपुन घेतली होती.भाजावळ करुन जमीन नांगरुन पेराही केला होता.

अचानक कोसळलेल्या पावसाने वीज गायब झाली होती.काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरु आहेत तेथील माती रस्त्यावर आल्याने वाहनांचा वेग मंदावला होता.सुमारे एक तास हा पाउस बरसुन गेला.लाॅकडाउन मध्ये घरात बसुन कंटाळलेल्या बालमिञांनी माञ या पावसात भिजुन आपला आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT