helmet compulsory rule in ratnagiri city not done said corporation meeting in ratnagiri 
कोकण

हेल्मेट सक्ती थांबवा, नाहीतर भाडेतत्त्वावर असलेला वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाचा करार रद्द करू ; रत्नागिरीच्या पालिका सभेत ठराव

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरात होणारी हेल्मेट सक्ती दुचाकी वाहनधारकांना डोकेदुखी ठरत आहे. वाहतूक पोलिसांकडून कोणतेही सौजन्य दाखविले जात नाही. लोकप्रतिनिधींनाही जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. नागरिकांमध्ये या सक्तीमुळे असंतोष आहे. 

वाहतूक निरीक्षक किंवा पोलिस अधीक्षकांना भेटून ही सक्ती मागे घ्यावी, अशी विनंती करू, अन्यथा पालिकेच्या गाळ्यामध्ये नाममात्र भाडेतत्त्वावर असलेला वाहतूक पोलिसांच्या कार्यालयाचा करार रद्द करू, असा निर्णय पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज भाजपचे नगरसेवक राजू तोडणकर यांनी हा विषय उचलून धरला. 

दुचाकीस्वारांच्या सुरक्षेचा प्रश्‍न असला तरी शहरात नको, शहराबाहेर हेल्मेट सक्ती करावी, अशी विनंती करूया अन्यथा पालिकेच्या गाळ्यांमध्ये नाममात्र भाडेतत्त्वावर असलेल्या वाहतूक पोलिस कार्यालयाचा करार रद्द करू, असे मत मांडले. याला सर्व सदस्यांनी पाठिंबा देत तसा ठराव केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी हेल्मेट सक्ती रद्दची मागणी केली होती. 

नागरिक म्हणतात

  • पुण्यासारख्या मोठ्या शहरातही हेल्मेट सक्ती नाही, तर मग रत्नागिरी शहरात हेल्मेट सक्ती का?
  • हेल्मेट सक्तीमुळे वाहतूक पोलिसांचा मूळ उद्देश बाजूला पडत आहे.
  • विनाहेल्मेट रस्त्यावर कोण येतो, हे शोधण्याचीच त्यांची ड्यूटी आहे का?
  • ३० रुपयाचे दूध आणण्यासाठी आलेल्या दुचाकीस्वारालाही ५०० रुपयाचा दंड केला जातो

"शहरातील हेल्मेट सक्ती रद्द करण्याचा ठराव घेऊन वाहतूक पोलिस किंवा पोलिस अधीक्षकांना भेटून तशी विनंती करू. पोलिस अरेरावी करतात हे सांगू. लोकप्रतिनिधींना अशी वागणूक देणे योग्य नाही."

- राजू तोडणकर, नगरसेवक 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

Air Force Recruitment 2025 : बारावी पास विद्यार्थ्यांसाठी हवाई दलात सामील होण्याची ‘सुवर्ण संधी’ !

Latest Maharashtra News Updates : गोदावरी कालवे 45 दिवस सुरू राहिल्याने जमिनी झाल्या नापिकी

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT