The Herne Port Center is buzzing 
कोकण

मच्छिमारांना दिलासा : हर्णे बंदर गजबजले

सकाळ वृत्तसेवा

हर्णे (रत्नागिरी) : कोरोनाच्या धास्तीने गेले महिनाभर बंद राहिलेली मासेमारी  सुरु झाली आहे. मोठमोठया मस्यकंपन्यांना मासळीचा पुरवठा करण्याकरिता मासळी खरेदी सुरू झाली असल्याने कंपन्यांना सप्लाय करणाऱ्या हर्णे बंदरातील मच्छि व्यापाऱ्यांचे सेंटर गजबजले आहेत.

हर्णै बंदरातील मासेमारी लॉकडाऊन कालावधीत सुरुवातीपासूनच पूर्ण बंद ठेवण्यात आली होती. मात्र जून, जुलै या दोन महिन्यात पावसाळी मासेमारी बंदी कालावधीचा विचार करून केंद्रशासनाने मासेमारीला लॉकडाऊन मधून नियम व अटी नुसार सवलत दिली आहे. मात्र अनेक नौकांचे खलाशी गावी गेले आहेत व कोरोनाच्या धास्तीने बहुतांशी नौकामालकांनी नौका बंद ठेवल्या आहेत.  काही ठराविक नौकांनी मासेमारी सुरु केली असून सध्या हा माल फक्त मस्यकंपन्यांनाच जात आहे.

अनेक मच्छि कंपन्यांचे हर्णे बंदरातील व्यापारी येथे सेंटर वर मासळी खरेदी करून घेत आहेत. त्यामुळे मच्छीमाराना दिलासा मिळाला असून हर्णै बंदरातील मच्छिची सेंटर गजबजलेली दिसत आहेत. हर्णै मधून रोजच मच्छिच्या गाड्या कंपन्यांना माल घेऊन जिल्ह्याबाहेर जात आहेत. मात्र कोरोनाचा सहज होणारा संसर्ग या पार्श्वभूमीवर प्रत्येक सेंटरमालकांनी सोशल डिस्टनसिंगची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया आघाडी'चा मोर्चा; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा आकाशवाणी परिसरात ठिय्या, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

Vastu Tips: राजकारण आणि सरकारी नोकरीत यश मिळवून देतील घरातील 'या' २ दिशा; पण 'ही' एक चूक कधीही करू नका!

ती गोष्ट घडली अन् अजय देवगनने धरला तब्बल २० वर्षाचा अबोला; कोण आहे तो व्यक्ती आणि असं काय घडलं?

IND A vs AUS A: एका कॅचसाठी भारताच्या दोन खेळाडूंची टक्कर... पुढे जे घडले त्यावर कुणालाच विश्वास बसला नाही, Video Viral

'आता दे ग दे जुजबी गालावर' सोनाली बेंद्रे आणि सई ताम्हणकरचा भन्नाट डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाली... Video Viral

SCROLL FOR NEXT