education minister uday samant  esakal
कोकण

चिपळूण वस्तुसंग्रहालयासाठी 50 लाखाचा निधी: उदय सामंत

राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा

पन्नास लाख रुपये वस्तुसंग्रहालयाच्या आणि वाचनालयाच्या उभारणीसाठी देत असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली.

रत्नागिरी: चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयातील वस्तुसंग्रहालयाच्या उभारणीसाठी ५० लाखांचा निधी दिला जाईल, अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

गेल्या २२ जुलै रोजी चिपळूणमध्ये आलेल्या महापुरात दुकानांचे, घरांचे मोठे नुकसान झाले. अनेक संस्थांनाही याचा फटका बसला. शतकोत्तर सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या लोकमान्य टिळक वाचनालयाने दोनच वर्षांपूर्वी ऐतिहासिक वस्तूंचे एक संग्रहालय उभे केले होते. त्यामध्ये जुन्या काळातील नाणी, जुने दस्तऐवज, बॉण्ड पेपर, जुन्या मूर्ती असे बरेच काही महापुरात खराब झाले. काही वस्तू वाहून गेल्या.

चिपळूण शहरासह कोकणचे वैभव असलेल्या या वस्तुसंग्रहालयाच्या उभारणीसाठी सामंत यांनी ५० लाख रुपये निधी देण्याचे जाहीर केले आहे. रत्नागिरी पालिकेला विकासकामांसाठी साडेचार कोटींचा निधी आला आहे. त्यातील केवळ चार कोटींच्या निधीची सध्या आवश्यकता आहे. त्यामुळे त्यातील पन्नास लाख रुपये वस्तुसंग्रहालयाच्या आणि वाचनालयाच्या उभारणीसाठी देत असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''माझा भाऊ...'' मनोज जरांगेंच्या मुंबई आंदोलनावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया

National Unity Day : गुजरातमध्ये पार पडणार राष्ट्रीय एकता दिन ; संजीवनीचे बॅण्ड पथक देणार पंतप्रधान मोदींना सलामी

Noida Owl Terror: कुत्रे-माकडांनंतर आता घुबडांची दहशत; थेट डोक्यावर झडप, शहरातील नागरिकांमध्ये पसरली आहे भीती

Ganesh Aarti: यंदा गणपतीच्या आरतीसाठी पुस्तक शोधण्याची गरज नाही; सगळ्या आरत्या मिळवा एकाच ठिकाणी, एका क्लिकवर!

Marathi News Live Updates: ...तर आम्ही रस्त्यावर उतरु- बबनराव तायवाडे

SCROLL FOR NEXT