Home Minister Anil Deshmukh call communications the staff and officers of the district police force 
कोकण

हॅलो... तुम्ही कसे आहात म्हणत गृहमंत्री देशमुखांनी काॅल करुन पोलिसांशी विचारली खुशाली...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : हॅलो... तुम्ही कसे आहात, तुमचे सर्वांचे मनापासून कौतुक. तुमच्यामुळे आम्ही ताठ उभे आहोत. आम्ही सुखरुप आहोत, तुम्ही आमचा मान आणि कणा आहात. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असे ऋण व्यक्त करणारा फोन चक्क गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा पोलिस दलातील कार्मचारी, अधिकार्‍यांना केला. या फोनमुळे पोलिस कर्मचार्‍यांनी समाधान व्यक्त करी नव्या दमाने ते पुन्हा कर्तव्याला लागले आहेत.


कोरोना काळात 3 महिने सतत ड्युटी करून समाजाला सुरक्षित ठेवण्याची महत्वपूर्ण कामगिरी महाराष्ट्र पोलिस करत आहेत. अनेक पोलिसांना आपला जीवदेखील गमवावा लागला आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून रत्नागिरीच नव्हे, तर महाराष्ट्रातील पोलिस रस्त्यावरची, सार्वजनिक ठिकाणी गर्दी कमी करण्यासाठी दिवसरात्र ड्युटी करत आहे. सुरवातीला नियम कडक असताना पोलिसांमुळेच कोरोना आटोक्यात आला होता. कारण नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये, यासाठी पोलिस चोख ड्युटी बजावत होते. इतकेच नव्हे तर कोरोनासंदर्भात नागरिकांनी अधिक अलर्ट राहावे यासाठी जनजागृतीचे अनेक उपकम रत्नागिरी जिल्ह्यातही घेण्यात आले.

दोन महिने उलटून गेले तरी कोरोनाची संख्या कमी होत नसल्याने हळूहळू जनजीवन पूर्ववत करण्यासाठी शासनाने थोडी शिथिलता आणली. त्यामुळे पोलिसांवरही ताण कमी झाला. पोलिसांनी केलेली कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे.अजूनही कंन्टेमेंट झोन असेल व इतर भागात पोलिस 24 तास ड्युटी करत आहेत. या पोलिस अधिकारी कर्मचार्‍यांना प्रोत्साहन आणि मनोबल वाढविण्यासाठी थेट गृहमंत्र्यांनी अनिल देशमुख यांनी पोलिसांशी संवाद साधला. जिल्हा पोलिस दलातील काही कर्मचार्‍यांना आज फोन आले. हॅलो, मी गृहमंत्री अनिल देशमुख बोलतोय, कसे आहात, कोरोना काळात तुम्ही सर्वांनी चांगली ड्युटी केली, या वाक्याने कर्मचारीही भारावून गेले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Prediction: सोन्याचा भाव 2030 पर्यंत 2 लाखांच्या पुढे जाणार! काय आहे तज्ञांचा नेमका अंदाज?

Maratha Reservation: मनोज जरांगेंचा मुंबईकडे प्रवास सुरू; दोन वाहने आणि दोन रुग्णवाहिका सोबत, पाटोद्यात पहिला मुक्काम

Suryakumar Yadav: B. Com च्या दिवसांत असा दिसायचा सूर्या! त्याच्याच कॉलेजने शेअर केले अनसीन Photo; एकदा पाहाच

बुलडोझर कारवाईत मर्यादा ओलांडली; हायकोर्टानं अधिकाऱ्यांना फटकारलं, इमारत पुन्हा बांधा आणि १० लाख देण्याचे आदेश

Latest Marathi News Update : धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

SCROLL FOR NEXT