कोकण

'रत्नागिरीत क्वारंटाईन प्रवाशांच्या हातावर शिक्के मारणे बंधनकारक'

45 वर्षावरील लसीकरण बंद पडण्याची शक्यता; उदय सामंत

राजेश शेळके

रत्नागिरी : कोकण रेल्वेने (kokan Railway) येणार्‍या प्रवाशांचे स्क्रिनिंग अपेक्षेप्रमाणे होत नाही, अशा तक्रारी आहेत. बहुतेक प्रवासी थेट होम क्वारंटाईन (Home Quarantine) होतात. त्यांची चाचणी होत नसल्याने त्यापैकी बाधित कोरोनाचे (Covid-19) प्रसारक ठरू शकतात. हा धोका टाळण्यासाठी होम आयसोलेशनमध्ये असलेल्यांच्या डाव्या हातावर, तर होम क्वारंटाईन असलेल्याच्या उजव्या हातावर शिक्क मारा. ते बाहेर फिरताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करा, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रशासनाला दिले.

ते म्हणाले, जिल्ह्यात अपेक्षित लस (Covid -19 Vaccine) उपलब्ध न झाल्याने 45 वर्षावरील वरील लसीकरण बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे 45 वरच्या लोकांसाठी जास्तीत जास्त लस द्या, अशी मागणी शासनानेकडे (State Government) केली आहे. हाफकिन नावाच्या कंपनीला लस तयार करण्यासाठी 55 कोटी रुपये शासनाने दिले आहेत. लवकरच मोठ्या प्रमाणात लस मिळेल. जिल्ह्याला (Ratnagiri District) 12 रुग्णवाहिका (Abulance) मिळणार आहेत. त्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स पोर्टलला पैसे भरले आहेत. काही दिवसात त्या जिल्ह्याला मिळतीस.

जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांना चांगल्यापद्धतीने लसीकरण व्हावे, यासाठी नियोजन केले जात आहे. म्हणून नोंदणी (Online Registration) करूनच लसीसाठी केंद्रावर जावे. विनाकारण गर्दी करून कोरोना वाढीची केंद्र ठरू नये, याची दक्षता घ्या. आरटीपीसीआर चाचणीचा (RTPCS Report) रेट शंभर चाचण्यामध्ये 15 टक्के आहे. अ‍ॅण्टीजेन चाचणीचा 32 टक्के आहे. अ‍ॅण्टीजेन (Antigen Test) चाचणी खात्रीशिर नाही, ती बंद करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. याबाबत उदय सामंत म्हणाले, अ‍ॅण्टीजेन चाचणीबाबत मी कोणताही दावा करणार नाही. मात्र माहिती घेऊन सांगतो. आरटीपीसीआर चाचण्या जास्तीत जास्त कराव्यात अशी मागणी आहे. जिल्हा रुग्णालयातील कोरोना चाचणी प्रयोगशाळेवर ताण वाढल्याने दुसरे मशिन बसविण्याचे काम सुरू आहे. तीन ते चार दिवसात ते पूर्ण होणार आहे.

मारहाण न करता यंत्रणेकडे तक्रार करा

डॉक्टरांना मारहाण करणे योग्य नाही. ते कोविड योद्धे म्हणून 24 तास राबत आहेत. त्यामुळे रुग्ण, नातेवाईक किंवा अन्य सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे, की काही चुकीचे घडले असेल तर यंत्रणेमार्फत तक्रार करा. परंतु डॉक्टरांना मारहाण करू नका. कामथे रुग्णालयात नुकताच हा प्रकार घडला होता.

  • 6 लाख 23 हजार (18 ते 44) या वयोगटातील लोक.

  • 4 लाख 57 हजार 126- (45 पासून पुढच्या वयोगटातील आहेत.)

  • पहिला डोस घेतलेले 83 हजार 356 जण आहेत.

  • दुसरा डोस घेणार्‍यांची संख्या 10 हजार 687 आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अ‍ॅडव्हान्स कर भरलात का? आज शेवटची तारीख, न भरल्यास होईल दंड

Sanjay Raut : भारत-पाक सामन्यामुळे पाकिस्तानला मिळाले हजार कोटी रुपये? संजय राऊत म्हणतात दीड लाख कोटींचा जुगार...

Gold Rate Today : आज अचानक उतरले सोन्याचे दर! किती हजारांनी स्वस्त झालं, पाहा एका क्लिकवर

Nashik News : नाशिक रोड परिसरात धक्कादायक घटना: मुंबई-हावडा एक्सप्रेसखाली उडी घेऊन प्रेमीयुगुलाने जीवन संपवले

India vs Pakistan Asia Cup : 'ऑपरेशन सिंदूर'वरून भारताला डिवचणाऱ्या पाकिस्तानच्या खेळाडूंनी किती धावा केल्या? पाहा स्कोअर कार्ड..

SCROLL FOR NEXT