Homeopathic Doctor in Government Service 
कोकण

'होमिओपॅथिक डॉक्टर शासकीय सेवेत'; 'या' आमदाराच्या लढ्याला यश 

मुझफ्फर खान

चिपळूण - होमिओपॅथिक डॉक्टरांना प्रशिक्षण देवून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांच्या पाठपुराव्याला यश आले असे, असे मत डॉक्टरांतून व्यक्त होत आहे. 

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर होमिओपॅथिक डॉक्टर्सं असोसिएशनकडून आमदार भास्कर जाधव यांना पत्र देण्यात आले होते. होमिओपॅथिक डॉक्टरांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी असोसिएशनकडून आमदार जाधव यांच्याकडे करण्यात आली होती. आमदार जाधव यांना होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्‍न माहीत आहेत. ते अनेक प्रश्‍न सरकारकडे अभ्यासपूर्ण मांडतात त्यामुळे होमिओपॅथिक डॉक्टर्सं असोसिएशनने त्यांचे प्रश्‍न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे मांडण्यासाठी जाधव यांना निवेदन दिले होते. 

प्राथमिक उपचार व्यवस्थेमध्ये होमिओपॅथिक डॉक्टरांचे स्थान लक्षात घेवून आमदार जाधव यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार केला. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांना फोन करून होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्‍न सोडवण्याची मागणी केली. आरोग्यमंत्री टोपे यांनी आमदार जाधव यांची मागणी तत्काळ मान्य केली. 

होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी लवकरच प्रशिक्षण कार्यक्रम निश्चित करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी आमदार जाधव यांना दिली. त्यामुळे राज्यातील  होमिओपॅथिक डॉक्टरांना न्याय मिळल्याच्या भावना डॉक्टर व्यक्त करत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Gavit: सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला अडीच तास ताटकळत ठेवलं! दिलीप गावित यांचा राज ठाकरेंवर संताप

Karamad-Ladsawangi Accident : करमाड–लाडसावंगी रस्त्यावरील खड्ड्यांचा तिसरा बळी; भरधाव टेम्पोच्या धडकेत ७९ वर्षीय वृद्धेचा मृत्यू, चालक फरार

Marathi News Live Updates: मोहन भागवत यांनी सातत्याने 'जनरेशन झेड'शी संवाद साधला आहे, याचा मला आनंद - राहुल नार्वेकर

Godavari Fisherman Electrocuted: गोदावरीच्या पुरात मासेमारी करताना मच्छीमाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; नदीत उतरलेल्या वीजप्रवाहावरून ग्रामस्थांचा संताप

Rajgad Khopadewadi funeral crisis: राजगड परिसरातील खोपडेवाडीत ताडपत्रीखाली अंत्यसंस्कार; स्मशानभूमीअभावी ग्रामस्थांचा संताप उफाळला

SCROLL FOR NEXT