Hunting Of Gava By Electric Shock Ratnagiri Marathi News 
कोकण

अरे बापरे ! येथे अशी केली जाते गव्यांची शिकार

सकाळ वृत्तसेवा

संगमेश्‍वर ( रत्नागिरी ) - शेताचे नुकसान करतो म्हणून गव्याला विजेच्या तारांचा शॉक देऊन ठार मारण्यात आले. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह पुरल्याप्रकरणी पाच जणांवर आज गुन्हा दाखल केला आहे. त्यात गावच्या सरपंचांचा समावेश आहे. हा प्रकार संगमेश्‍वर तालुक्‍यातील कुंभारखाणी बुद्रुक येथे दोन महिन्यांपूर्वी घडला आहे. 

याबाबत परिक्षेत्र वनाधिकारी, रत्नागिरी प्रियंका लगड यांनी दिलेली माहिती अशी - वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संगमेश्‍वर तालुक्‍यातील कुंभारखाणी बुद्रुक या गावात गव्याला विजेचा शॉक देत ठार मारून त्याला तिथेच पुरण्यात आल्याचे कळले. यानुसार रत्नागिरी - चिपळूणचे विभागीय वनाधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियांका लगड यांनी, देवरूखचे वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक नानू गावडे, सागर गोसावी, महादेव पाटील, मिलिंद डाफळे, अरविंद मांडवकर यांना घेऊन संबंधित गावाला भेट दिली. या वेळी गव्याचा पुरलेला मृतदेह उकरून काढला. हा प्राणी गवाच आहे, याची खात्री करण्यासाठी देवरूखचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जंगम यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर तो प्राणी गवाच असल्याचे सिद्ध झाले. 

सरपंचावरही गुन्हा दाखल

ही जागा सुरेश सीताराम सुटाके यांची असल्याचे समजले. या पथकाने सुटाके यांची त्यांच्या घरी भेट घेतली. त्यांनी रानटी प्राणी शेतीला त्रास देतात म्हणून आपण शेताला तारेचे कुंपण घातले असून त्यात वीजप्रवाह सोडला होता. यात विजेचा धक्‍का लागून गवा ठार झाला. त्यांना साथीदारांसह त्याच जागी पुरल्याचे सांगितले. यानंतर या पथकाने सुटाके यांचा जबाब घेतला. त्यानुसार त्यांना पुरण्यासाठी मदत केल्याप्रकरणी बाळू घडशी, दत्ताराम गुणाजी मानकर, तुकाराम दादोजी सुर्वे यांच्यावरही गुन्हा दाखल केला. सुटाके यांनी या घटनेची माहिती सरपंच दिलीप मनोहर सुर्वे यांना दिली होती. त्यांनी ती शासनापासून लपवून ठेवली तसेच एकप्रकारे या प्रकाराला साथ दिल्याबद्दल त्यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. 

तपासाला सहकार्य करण्याची ग्वाही बाॅन्ड पेपरवर 

याबाबत सर्वांचे जबाब नोंदवण्यात आले असून या तपासाला सहकार्य करू, अशी ग्वाही सर्वांनी एका बॉन्ड पेपरवर लिहून दिली आहे. यानुसार या पाचही जणांवर वनविभागाचा प्रथम गुन्हा अहवाल दाखल करण्यात आला असून यापुढे विभागीय वनाधिकारी यांच्यासमोर जबाब झाल्यानंतर हे प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर या सर्वांना शिक्षा होईल, असे लगड यांनी सांगितले. 

दुर्गंधीमुळे प्रकार उजेडात 

हा प्रकार दोन महिन्यांपूर्वी घडला होता; मात्र पुरलेला गवा कुजल्यानंतर त्याची दुर्गंधी येऊ लागल्याने गावात चर्चा सुरू झाली. यातून काहींनी वनविभागाशी संपर्क करून या प्रकाराची माहिती दिली. त्यामुळे या पाचही जणांवर गुन्हा दाखल करण्यात वनविभागाला यश आले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: प्रतीक्षा संपली, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज, 'या' महिन्यात होणार उद्घाटन

‘आतली बातमी फुटली’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर भेटीला

Digital Arrest: कुटुंबासह बॅंक अधिकाऱ्याला एक महिना; ‘डिजिटल अरेस्ट’, ३९ लाखांनी घातला गंडा, सायबर पोलिसांत गुन्हा

Chh. Sambhajinagar Accident: सिडकोतील जळगाव रस्ता परिसरात भरधाव कारने उडवला वृद्ध पशुवैद्यक, घटनास्थळीच मृत्यू

Pune Traffic: नवले पुलाजवळील सेवारस्ता धोकादायक; नऱ्ह्यात सांडपाणी वाहिनीवरील झाकणे गायब, अपघाताची शक्यता

SCROLL FOR NEXT