hurricane distrory in dapoli harne ratnagiri 
कोकण

वादळानंतर : जंगली प्राणी गावात येण्याचा वाढला धोका अन्....

मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : रोजगार हमी योजनेतून फळबाग लागवड योजना मोठ्या प्रमाणात राबवली. आता बागांच्या पुनरुज्जीवन, पुनर्लागवडीसाठी याच योजनेचा आधार मिळावा. पूर्वी भूविकास बँकेची दीर्घ मुदतीची कर्ज योजना होती, म्हणजे उत्पन्न सुरू झाले की कर्ज परतफेड करण्यास सुरवात व्हायची, अशा प्रकारची योजना आखण्याची गरज महेश परांजपे यांनी व्यक्त केली

.
ज्यांनी भातशेती सोडून दिली आहे, त्यामुळे त्यांनी नव्याने भातशेती पुन्हा सुरू करावी, म्हणजे पडीक क्षेत्र लागवडीखाली येईल. ना नफा ना तोटा तत्त्वावर केली तरी चालेल. पण थोडेफार उत्पन्न मिळेल व धान्याची समस्या सुटेल. हंगामी पर्यायी पिके घेता येतील. कारली, तोंडली, भोपळा, दुधीभोपळा, चिबूड आदी भाजीपालाही करता येईल. आंबा, काजू, फणस, कोकम, जायफळ यावर आधारित गृहोद्योग संपला आहे. त्यामुळे पर्यायी उत्पन्न म्हणून अन्य पिकांकडे पाहिले पाहिजे. हळद, काळीमिरीचे उत्पादन घेता येईल. त्याकरिता कृषी विद्यापीठाने मार्गदर्शन करावे, असे मत महेश परांजपे यांनी व्यक्त केले.

बागा पुनरुज्जीवनासाठी हवे बिनव्याजी कर्ज...
साग, फणस, शिवण, ऐन, किंजळ, जंगली झाडे पडली असून त्यापासून लाकडी साहित्य तयार करता येईल. ते उद्योजकापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. किमान यातून थोडे उत्पन्न, तोडकामाचा खर्च भागेल. यासाठी शासनाने नियमात शिथिलता आणावी व शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा परांजपे यांनी व्यक्त केली.


श्‍वापदे वस्तीत येण्याचा धोका

डोंगर, माळरान उजाड झाल्याने वानर, माकडे, जंगली श्‍वापदांचा आसरा गेला आहे. त्यामुळे भक्ष्याच्या शोधात व निवार्‍यासाठी हे प्राणी गावात येण्याचा धोका विसरून चालणार नाही. त्याकरिता ग्रामस्थांनी सज्ज राहिले पाहिजे, अशी अपेक्षा परांजपे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT