impact of sakal news library are open in chiplun ratnagiri from yesterday 
कोकण

Sakal Impact : चिपळूणात ग्रंथालये सुरू

मुझफ्फर खान

चिपळूण : राज्यातील टाळेबंदी शिथिल करताना सरकारने गुरूवारपासून ग्रंथालय सुरू करण्यास परवानगी दिली. त्यामुळे गुरूवारपासून जिल्ह्यातील ग्रंथालयाची दारे वाचकांसाठी खुली झाली आहे. येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाने ए. पी. जे. अब्दुलकलाम यांच्या जयंतीचे निमित्त साधत वाचनालय सुरू केले. 

'सकाळ' ने याकामी पाठपुरावा केल्याबद्दल लोटिस्माने 'सकाळचे' ही आभार मानले. गेल्या काही दिवसापासून ग्रंथालय सुरू करण्याची मागणी जोर धरत होती. अखेर या मागणीकडे सरकारने सकारात्मक दृष्टीने पहिल्याने वाचकप्रेमी सुखावले आहे. बुधवारी (14) ग्रंथालय सुरू करण्यास परवानगी दिल्याची घोषणा सरकारने केली. मात्र सरकारकडून कोणतेही लेखी पत्र मिळाले नाही. तरीही खबरदारी घेत ग्रंथालय चालकांनी ग्रंथालय सुरू केली आहेत. जिल्ह्यातील ग्रंथालय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिल्यानंतर वाचकांकडून सुरवातीला अल्पप्रतिसाद मिळत आहे. शासनाने बंदी उठविल्याची माहिती वाचकांपर्यंत पोहचल्यानंतर ग्रंथालयात गर्दी वाढेल असा विश्‍वास ग्रंथालय चालकांना आहे.

शासनाने ग्रंथालय सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर येथील लोकमान्य टिळक वाचन मंदिराने पहिल्या दिवशी ग्रंथालये, पुस्तकांची स्वच्छता करून घेतली. संपूर्ण ग्रंथालय तसेच अपरांत संशोधन केंद्र सॅनिटायझ करून घेतले. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुलकलाम यांचा जन्मदिवस देशात वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाची संधी साधत लोटिस्माचे वाचनालय सुरू करण्यात आले. लोटिस्माचे अध्यक्ष अरूण इंगवले कार्यवाह विनायक ओक, ग्रंथपाल सौ. गौरी भोसले, संदीप जाधव, मेघना जाधव, सुजाता गुढेकर, निला बापट, साक्षी बापट यावेळी उपस्थित होते.

सहा महिन्याहून अधिक काळ बंद असलेली ग्रंथालये सुरू करण्याबाबत जिल्ह्यात प्रथम सकाळने पुढाकार घेवून पाठपुरावा केला. याबद्दल लोकमान्य टिळक वाचन मंदिर वाचनालयाचे अध्यक्ष अरूण इंगवले, कार्यवाह प्रकाश देशपांडे यांनी 'सकाळ'चे आभार मानले. 

"शासनाच्या घोषणेनंतर आम्ही ग्रंथालय सुरू केले आहे. अद्याप लेखी आदेश मिळालेले नाही. पुढील दोन दिवसात ते येतील. वाचकांची अडचण लक्षात घेवून आम्ही ग्रंथालय सुरू केले आहे."

- प्रकाश देशपांडे, कार्यवाह लोटिस्मा चिपळूण


संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

Latest Marathi News Updates : उल्हासनगर स्मशानभूमीत डॉ. आंबेडकरांचा पुतळा; अनुयायांमध्ये संतापाची लाट

Nashik News : नाशिकला दिलासा! पावसाने उसंत घेतल्याने गंगापूर धरणाचे दरवाजे बंद; पूरस्थिती निवळली

महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण! 'शिवरायांच्या किल्ल्यासाठी PM मोदींनी केले विशेष प्रयत्न'; UNESCO च्या मानांकनानंतर काय म्हणाले फडणवीस?

SCROLL FOR NEXT