चिपळूण : चिपळूण-पोफळी (chiplun-pofali)मार्गावरील खेर्डी ते पिंपळी (kherdi to pimpli) पर्यंतच्या मार्गावर भरधाव वेगाने पळवल्या जाणाऱ्या वाहनांमुळे सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यात काहीजण मृत्युमुखी पडले असून काहींना कायमचे अपंगत्वदेखील आले आहे. त्यानंतर देखील वाहनचालकांना या मार्गावर वेगमर्यादा ओलांडून वाहने पळवण्याचा मोह आवरता येत नसल्याचे दिसून येत आहे.
चिपळूण शहराचे(chiplun city) उपगनर म्हणून ओळख असलेल्या खेर्डी परिसरातील रस्ता सिमेंटचा करण्यात आला आहे. पेढांबेपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहने भरधाव वेगाने पळवली जातात. या दुपदरी मार्गावर वाहनांसाठीची कमाल मर्यादा किती असावी, याची माहिती दर्शवणारे फलक कुठेही नाहीत. त्यामुळे वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवतात. दुचाकीचालकांचा त्यात मोठ्या प्रमाणात समावेश आहे.
नियम धाब्यावर
पेढांबे टोलनाक्यापासून पुढे पिंपळीपर्यंतचा थेट रस्ता आहे. त्यामुळे सुपर बाईक अतिवेगाने पळवण्यासाठी या मार्गाला पसंती मिळत आहे; मात्र अवजड आणि इतर चारचाकी वाहने या मार्गावरून प्रवास करत असतात. अशावेळी वेगाने येणाऱ्या दुचाकी इतर वाहनांवर आदळून अपघात होतात. दिवसा दुचाकी वेगाने चालवण्याचा थरार पाहायला मिळतोच, त्याशिवाय रात्री आठनंतर अनेक तरुण दुचाकी चालवण्याची स्पर्धाच लावतात. सद्यःस्थितीत चारचाकी आणि रिक्षाही सर्व नियम धाब्यावर बसवून पळवल्या जात आहेत. त्यांच्या वेगाला आवर घालण्यासाठी सिग्नल किंवा दंडात्मक कारवाईसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज आहे.
बहादूरशेख नाक्यापासून पेढांबेपर्यंतचा रस्ता सिमेंट काँक्रिटचा आहे. रस्त्यावर कुठेही गतिरोधक नाही. त्यामुळे वाहने वेगाने पळवली जातात. गर्दी असताना वाहनचालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होऊन वाहनचालक गंभीर जखमी होतात. चार महिन्यांत या मार्गावर तिघांचा जीव गेला. पोलिसांनी काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत.
- सुरेश गजमल. पिंपळी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.