INS Malvan esakal
कोकण

Indian Navy च्या ताफ्यात आता 'INS Malvan'; पाणबुडीविरोधी युद्धनौकेचं कोचीनमध्ये जलावतरण

तारकर्ली किनारी सोमवारी (ता. ४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

नौदलाने ताफ्यात दाखल करून घेतल्यानंतर ‘आयएनएस मालवण’, अशी ओळख असणारी पाणबुडीविरोधी युद्ध नौका असणार आहे.

मालवण : येथील तारकर्ली किनारी (Tarkarli Sea) सोमवारी (ता. ४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नौदल दिन साजरा होत आहे. या सोहळ्याच्या पूर्वीच नौदलाने (Indian Navy) मालवणाचा सन्मान केला आहे. मालवण नावाच्या पाणबुडीविरोधी युद्धनौकेचे काल (ता. ३०) कोचीन येथे जलावतरण करण्यात आले.

नौदलाने ताफ्यात दाखल करून घेतल्यानंतर ‘आयएनएस मालवण’, अशी ओळख असणारी पाणबुडीविरोधी युद्ध नौका असणार आहे. अशा नोकांची नौदलाला गरज होती. या नौका उभारणीचे कंत्राट कोचीन शिपयार्ड लिमिटेड या कंपनीला दिले आहे. त्यातीलच मालवणसह अन्य दोन युद्ध नौकांचे काल जलावतरण झाले.

कोचीन शिपयार्डमध्ये अशा प्रकारे आठ युद्ध नौकांची बांधणी होत आहे. यापैकी तीन नौकांची बांधणी पूर्ण झाली असून त्यांचे काल एकाच वेळी जलावतरण झाले. या तीन नौकांची नावे ‘मालवण’, ‘मंगरोल’ व ‘माहे’, अशी आहेत. ‘मंगरोल’ हे शहर गुजरातच्या किनारपट्टीवर तर ‘माहे’, हे केरळ जवळील समुद्रकिनारी असलेले शहर आहे. तिन्ही युद्ध नौकांची नावे समुद्रकिनारी असलेल्या शहरांची दिली आहेत,अशी माहिती नौदलाकडून देण्यात आली.

‘मालवण’चे जलावतरण दक्षिण कमांडचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल सूरज बेरी यांच्या पत्नी कंगना बेरी यांच्या हस्ते तर ‘मंगरोल’चे जलावतरण उपनौदल प्रमुख व्हाईस अॅडमिरल संजय सिंह यांच्या पत्नी झरीन लॉर्ड सिंह यांच्या हस्ते तर ‘माहे’चे जलावतरण भारतीय नौदल अकादमीचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल पुनीत बहल यांच्या पत्नी अंजली बहल यांच्या हस्ते झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT