Insurance Company Ignore on farmer Insurance kokan marathi news 
कोकण

विमा कंपनीची ही चूक पडली शेतकऱ्यांना भारी ; झाले कोटयावधींचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधूुदूर्ग) : विमा कंपनीच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस यामुळे नुकसान झालेले ५३७ शेतकरी अद्यापही ६१ लाख रुपयांच्या विमा नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळत नसल्याने उन्हाळी हंगामात पीक विमा उतरविण्यास शेकऱ्यांकडून नकार दिला जात आहे.

खरीप हंगाममध्ये जिल्ह्यात ७६० शेतकऱ्यांनी २२१.३४ हेक्‍टर क्षेत्र विमा हप्ता भरून संरक्षित केले होते. दरम्यानच्या कालावधीत ऑगस्ट महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि ऑक्‍टोबरमधील अवकाळी पाऊस यामुळे जिल्ह्यात पीक विमा उतरविलेल्या ५३७ शेतकऱ्यांच्या ३९.९२ हेक्‍टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानीचे वैयक्तिक पंचनामे हे कृषी विभागामार्फत केले होते. त्यांना या नुकसानीपोटी ६१ लाख रुपये भरपाई मंजूर झाली आहे; मात्र विमा कंपनीचे जिल्हा प्रतिनिधी, अधिकारी कर्मचारी शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी सक्रिय नसल्याने बऱ्याच ठिकाणी शेतकरी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.

 ५३७ शेतकरी विम्याच्या रक्‍कमेपासून वंचित

नुकसान झाल्याने ही भरपाई विमा कंपनीकडून नोव्हेंबर २०१९ अखेरपर्यंत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणे आवश्‍यक होते; मात्र विमा कंपनी आणि त्यांचे प्रतिनिधी यांनी येथील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून देण्याकडे दुर्लक्ष केल्याने जिल्ह्यातील ५३७ शेतकरी विम्याच्या रक्‍कमेपासून वंचित राहिले आहेत. विम्याची रक्कम देण्यास विमा कंपनी दुर्लक्ष करीत असून शासनाने त्याकडे लक्ष द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

विमा उतरविण्यास शेतकरी अनुत्सुक
शेतकऱ्यांकडून खरीप हंगामात शेतीचा विमा उतरविला होता; मात्र विमा कंपनीच्या दुर्लक्षामुळे ५३७ शेतकऱ्यांना नुकसानीचा विमा अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे चालू उन्हाळी हंगामातील पिकांचा विमा उतरविण्यासाठी शेतकऱ्यांनी उत्सुकता दाखविलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Liam Livingstone ला १३ कोटी देण्याची खरच गरज होती का? काव्या मानरच्या निर्णयावर होतेय टीका, मोहम्मद शमीचं नाव ओढलं जातंय... कारण

Kalyan Dombivli Elections: कल्याण डोंबिवलीत ठाकरे एकजुटीचे राजकीय संकेत; महापालिका रणधुमाळीपूर्वी हालचालींना वेग

Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?

Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला

Nashik Marathi Vishwa Sammelan : नाशिकमधील 'मराठी विश्व संमेलन' लांबणीवर; जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीत रंगणार सोहळा!

SCROLL FOR NEXT