The investigation into the Amboli case continues 
कोकण

मळगावकर घातपात, संशयितांकडून दिशाभूल

भूषण आरोसकर

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - आंबोली घाटात आढळून आलेल्या गितांजली मळगावकर घातपात प्रकरणी दुसऱ्या दिवशीही पोलिसांना मोबाईल पर्स, चप्पल या गोष्टी हाती लागल्या नाहीत. पोलिसांनी दोघा संशयितांना घेऊन आज पुन्हा घटनास्थळाची पाहणी केली; मात्र त्यांच्याकडून पोलीस तपासात दिशाभूल केली जात असल्याचे पोलीस उपनिरीक्षक तौफिक सय्यद यांनी सांगितले. 

आंबोली घाटात तीन आठवड्यापूर्वी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचा तपास करताना येथील पोलिसांनी योगेश आडणेकर (रा. कोलगाव) व योगेश कांबळे (रा. सावंतवाडी, गरड) याच्यासह अन्य दोघा अल्पवयीन युवकांना संशयित म्हणून ताब्यात घेतले. यातील आडणेकर व कांबळे यांनी घाटातील त्या महिलेचा आपणच घातपात केल्याचे कबूल करत ही महिला मळगाव येथील बेपत्ता असलेली गीतांजली मळगावकर हिच असल्याचे स्पष्ट केले होते.

त्यानंतर पोलिसांनी तपासाला गती देताना या प्रकरणामध्ये अन्य कोणाचा सहभाग आहे का? याबाबत शहानिशा करण्याचा प्रयत्न केला; मात्र यामध्ये अवैध धंद्यातील काहींची नावे पुढे येत असताना आता पोलिसांकडून यामध्ये अन्य कोणी संशयित नसल्याचे सांगण्यात येत आहे; परंतु संबंधित महिलेची पर्स, मोबाईल, चप्पल अद्यापही पोलिसांना आढळून आले नाही. आज दुसऱ्यांदा पोलिसांच्या पथकाने आंबोली घाटामध्ये दोघा संशयितांना घेऊन शोध मोहीम राबवली; मात्र आरोपींकडून दाखवण्यात आलेली जागेवर काही सापडून आले नाही. त्यामुळे संशयितांकडून पोलिसांच्या तपासात दिशाभूल केली जात असल्याचे तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. सय्यद यांचे म्हणणे आहे. 

नेमका मृत्यू झालाच कसा? 
या प्रकरणातील दोन्ही संशयितांकडून वेगवेगळी जागा दाखवण्यात येत असल्याने संशयितांच्या जबाबात विसंगती आढळत आहे. यातील प्रमुख संशयित योगेश आडणेकर हा त्या वस्तू माडखोल नदीत फेकल्याचे सांगत आहे तर योगेश कांबळे हा आंबोली घाटात फेकल्याचे सांगत आहे. शिवाय त्यांनी प्रारंभी महिलेचा घातपात केल्याची कबुली दिली होती; मात्र आता ते तपासात कसेल सहकार्य करत नसून घातपात केला नसल्याचे सांगत आहेत. त्यामुळे महिलेचा मृत्यू नेमका कसा झाला? याबाबत अजूनही शाशंकता आहे. व्हिसेरा व डिएनए रिपोर्टमधूनच नेमके कारण पुढे येईल, असे सय्यद म्हणाले. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: रेल्वेचा प्रश्न सोडवला आता पुढचा प्रश्न पाण्याचा! मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळ काय असतो हेसुद्धा मराठवाडा विसरून जाईल

Latest Marathi News Updates : उद्धव ठाकरे शिवाजी पार्कमध्ये दाखल, मीनाताईंच्या पुतळ्याची पाहणी

Mohol News : मोहोळ पोलिसांनी उघड केल्या दोन चोऱ्या, लाखाचा माल हस्तगत चोरटा पोलीसांच्या ताब्यात

Nashik News : ५ कोटींचे बक्षीस: नाशिकच्या ग्रामपंचायतींना समृद्ध होण्याची सुवर्णसंधी

Onion Production : आंध्र प्रदेशच्या धर्तीवर अनुदान मिळणार? कांदा प्रश्नावर समितीकडून सकारात्मक हालचाल

SCROLL FOR NEXT