Jaigad Fort esakal
कोकण

Jaigad Fort : जयगड किल्ल्याच्या बुरुजाला कशामुळे तडे? पुरातत्त्व विभागाच्या पाहणीनंतर महत्त्वाचा अहवाल समोर

जयगड किल्ल्याच्या (Jaigad Fort) ढासळत असलेल्या बुरुजाबाबत तहसीलदारांना अहवाल प्राप्त झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

किल्ल्याच्या २०० ते २५० मीटर अंतरावर यंत्राच्या साह्याने खाडीकडे खोदकाम मागील सहा महिने रात्र-दिवस सुरू आहे.

रत्नागिरी : केंद्र संरक्षित असलेल्या जयगड किल्ल्याच्या (Jaigad Fort) ढासळत असलेल्या बुरुजाबाबत तहसीलदारांना अहवाल प्राप्त झाला आहे. यामध्ये गेल्या सहा महिन्यांत किल्ल्याचे बुरूज ढासळत आहेत. यापूर्वी हा बुरूज सुस्थितीत होता. परंतु, शेजारी खोदकाम (ड्रेजिंग) सुरू झाल्यापासून ही परिस्थिती निर्माण झाल्याचे पंचायतीत नमूद असल्याचे अहवालात म्हटले आहे. याबाबत भूवैज्ञानिक पुणे (Geologist Pune) आणि पुरातत्त्व विभागाला (Archaeology Department) पाहणी करण्यासाठी पत्र दिले जाणार आहे.

जयगड किल्ल्याचा बुरूज ढासळत असल्याची माहिती पुढे आल्यानंतर प्रसारमाध्यमांनी हा विषय उचलून धरला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी यात विशेष लक्ष घातले आहे. त्याचीच दखल घेऊन तहसीलदार राजाराम म्हात्रे (Tehsildar Rajaram Mhatre) यांनी ताबडतोब किल्ल्याची पाहणी केली. लगेच सायंकाळपर्यंत पंचनाम्यासह अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. त्यानुसार संपूर्ण टीम, ग्रामस्थ आणि पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन बुरुजांची पाहणी केली. त्याचा पंचनामा करून जिल्हाधिकारी याकडे सादर करण्यात येणार आहे.

किल्ल्याच्या २०० ते २५० मीटर अंतरावर यंत्राच्या साह्याने खाडीकडे खोदकाम मागील सहा महिने रात्र-दिवस सुरू आहे. त्याआधी बुरुजाला अशा प्रकारचे तडे गेलेले नव्हते. आताच बुरुजांना तडे गेले आहेत, असे किल्ल्याचे संरक्षण करणारे कर्मचारी आणि पाहणीसाठी गेलेल्या अधिकारी, ग्रामस्थांच्या समक्ष पंचयादी करताना स्पष्ट केले आहे.

किल्ल्याच्या पूर्व बाजूस खाडीकडे अनधिकृत उत्खनन केले जाते. तसेच, भराव टाकून बांधकाम केले असल्यामुळे पाण्याचा प्रवाह बदलला आहे. लाटांमुळे तटबंदी आणि बुरुज ढासळत असल्याचे पंचयादीमध्ये म्हटले आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली, तर जयगड किल्ल्याचे अस्तित्व धोक्यात येईल. म्हणून दिवसरात्र ड्रेजिंग काम कंपनीने तत्काळ बंद करावे, असेही पंचयादीमध्ये म्हटले आहे. तसा अहवाल आज तहसीलदार यांना प्राप्त झाला आहे.

जयगड किल्ल्याचा बुरूज कशामुळे ढासळत आहे, याचे कारण स्पष्ट व्हावे, यासाठी पुणे भूवैज्ञानिक आणि पुरातत्त्व विभागाला आजच पत्र देत आहोत. त्यांच्याकडून किल्ल्याचा सर्व्हे होऊन अहवाल घेतला जाणार आहे.

-राजाराम म्हात्रे, तहसीलदार, रत्नागिरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT