kokanJaigad police station lodged a crime in violation of the order banning boat owners news 
कोकण

ते विनापरवाना समुद्रामार्गे बोटीमधुन आले अन्....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : राज्यात आणि जिल्ह्यात बंदी आदेश लागू असतानाही मुंबईतून दोन बोटीमधून प्रवाशांची वरवडे तिवरी बंदर पर्यंत वाहतूक करणाऱ्या दोन बोट मालकांवर बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयगड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या भारत देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणु या रोगाची साथ चालु असुन सदर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणुन जिल्हाधिकारी यांच्याकडून ३१ मार्च पर्यंत बंदि आदेश लागु करण्यात आला आहे. या कालावधीत पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.

आदेशाचा भंग केला म्हणून 

असे असतानाही माता रुक्मीणी बोटिचे मालक विष्णु विठ्ठल पवार (वय ५८ , रा . वरवडे खारवीवाडा, रत्नागिरी) व तांडेल प्रविण कृष्णा सुर्वे (वय ४३ . रा . वरवडे खारवीवाडा, रत्नागिरी) तसेच माता वैशाली बोटीचा मालक विघ्नेश नंदकुमार कोळी ( वय ३६ , रा . करंजा नवापाडा ता . उरण जि . रायगड ) व तांडेल साईनाथ मारुती भाटकर (वय ३६ , रा . कारुळभाटी ता . गुहागर जि . रत्नागिरी ) यांनी बोटीमधुन मोसमारी करणाऱ्या लोकांना मुंबई ते करंजा रायगड येथुन तिवरी बंदर वरवडे रत्नागिरी येथे समुद्रामार्गे विनापरवाना बेकायदेशीर पाठवले. जिल्हाधिकारी  यांच्या बंदी आदेशाचा भंग केला म्हणून  संबधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.        

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

असं काही बोलणं झालंच नाही! ट्रम्प यांचा दावा इराणने फेटाळला, घाबरलेल्या अमेरिकेचा वेळकाढूपणा

कोलंबियात हवाई दलाचं विमान कोसळून भीषण दुर्घटना, ११० सैनिकांचा मृत्यू; घटनेचे धक्कादायक व्हिडीओ समोर

खरातच्या संस्थानचं उत्पन्न साडे चार लाखांवरून वर्षाला अडीच कोटींवर; खडे, चिंचोके मंतरून लाखोंना विकायचा

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Air Pollution : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडची हवा बिघडतेय! शुद्ध हवेचे दिवस तीन महिन्यांत केवळ १५

SCROLL FOR NEXT