जाखडी नृत्य स्पर्धेत 'लोककलेचा जागर'
जाखडी नृत्य स्पर्धेत 'लोककलेचा जागर' sakal media
कोकण

जाखडी नृत्य स्पर्धेत 'लोककलेचा जागर'

सचिन माळी -सकाळ वृत्तसेवा

मंडणगड : कलगी- तुरा समाज उन्नती मंडळ मुंबई (रजि.) व सांस्कृतिक कार्य संचलनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने गौरी गणेश नृत्य स्पर्धा २०२१ स्पर्धा शनिवार ता.१३ नोव्हेंबर रोजी मुक्काम भवानी नडगाव, तालुका महाड येथे मोठ्या दिमाखदार पद्धतीने संपन्न झाली. रात्रभर रंगलेल्या या स्पर्धेतून लोककलेच्या माध्यमातून कोरोना जनजागृती करताना कोरोना योध्याना सलाम करून कलेचा जागर करण्यात आला. कलासंचांच्या उत्कृष्ठ सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

ज्येष्ठ शाहीर सोनूबुवा दंवडे यांच्या शुभहस्ते रिंगणमध्ये श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. स्पर्धेत रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील एकूण तेरा कलापथकांना प्रवेश देण्यात आला. प्रथम क्रमांक बक्षीस रोख रुपये ५ हजार सन्मान पत्र, सन्मानचिन्ह, ढोलकी विजेते अमर नाच मंडल करंजखोल महाड, द्वितीय क्रमांक रोख रुपये ३ हजार सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, ढोलकी विजेते भैरवनाथ कला मंडळ तुरेवाडी मंडणगड, तृतीय क्रमांक रोख रुपये २ हजार सन्मानपत्र, सन्मानचिन्ह विजेते भैरीभवानी नृत्य कला मंडळ भवानी नडगाव यांना गौरविण्यात आले. उत्तम नृत्य जबजरंग कलापथक चोचिंदे यांना सन्मान पत्र, नटराज, ढोलकी, उत्तम कवी डॉ. सूर्यकांत चव्हाण यांना सन्मानपत्र, सरस्वती प्रतिमा, उत्कृष्ट ढोलकीपट्टू सिद्धेश धाडवे सन्मानपत्र व ढोलकी, उत्कृष्ट गायक शाहीर कमलेश शिगवण यांना सन्मानपत्र व माइक देवून सन्मानित करण्यात आले. शिवाय सहभागी तेरा कलापथक संघाना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि ढोलकी मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.

शिवाय १५ वरिष्ठ शाहीरांचा मंडळाच्या वतीने शाल, सन्मानचिन्ह, सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कलगीतुरा मंडळाचे सरचिटणीस संतोष धारशे व पत्नी श्वेता धारशे यांचा सुद्धा शाल, श्रीफळ साडी देऊन मंडळांनी सन्मान केला. तसेच भवानी नडगाव ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्रालय कोरोना जाणीव जागृती अभियान कलाकार निवड समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल संतोष धारशे यांना सरस्वती देवीची प्रतिमा देऊन सन्मानित केले. सदर कार्यक्रमास आमदार भरत गोगावले, रायगड जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र सावंत, भाजप महाड तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, समाजसेवक इनायत देशमुख, गावचे पोलीस पाटील अनिल किजबिले, सरपंच राजनी बैकर, महाड मंडळाचे अध्यक्ष रामभाऊ टेंबे, सेक्रटरी अंकुश जाधव, कोलाड मंडळाचे अध्यक्ष सुरेश महाबळे, सेक्रेटरी नथुराम पाष्टे, शाहीर वसंत भोईर, कुणबी युवाध्यक्ष समीर रेवाले, दीपक महाडिक, संतोष घुळघुले यांनी उपस्थिती लावली. कलगी तुरा मुंबई मंडळाचे पंच शाहीर डॉ.सूर्यकांत चव्हाण, शंकर भारदे गुरुजी, सुरेश चिबडे, शशिकांत लाड, अनंत येलमकर, अनंत मुंगळे, कृष्ण जोगळे, निलेश जोगळे यांनी काम पहिले.

कार्यक्रमाचे सरपंच म्हणून मंडळाचे अध्यक्ष शाहीर अनंत तांबे, चंद्रकांत गोताड, संतोष धारशे हे होते. तर कार्यक्रमाचे नियोजन मंडळाचे सरचिणीस संतोष धारशे, खजिनदार सत्यवान यादव, चिटणीस सुधाकर मास्कर, शाहीर चंद्रकांत धोपट, अरविंद किजबिले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालय संतोष धारशे, सुधाकर मास्कर, आनंद दवंडे, नैनेश बैकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सरचिटणी संतोष धारशे, खजिनदार सत्यवान यादव, चिटणीस सुधाकर मास्कर, सुरेश चिबडे, निलेश जोगळे , शरद कदम, पोल्स नडगावचे पोलीस पाटील अनिल किजबिले, शाहीर सुभाष नगरकर, विठोबा कदम, नैनेश बैकर सोनु दगडू अगबूल,,वसंत बैकर,आनंद दवंडे, बळीराम घुरुप,रवींद्र दवंडे, गणेश बैकर, कृष्णा मोरे, ( परशुराम ) बाळाराम कदम, सुधीर दंवडे, महेंद्र दंवडे, परेश दवंडे, बाळा पांडे, समीर रेवाले, नितेश शेंडल, प्रकाश अगबूल , चंद्रकांत घुरुप ,रामू दवंडे, संतोष आटले, संतोष पारदले, पदाधिकारी, ग्रामस्थ, महिला, तरुण, मुंबई मंडळ नडगाव यांनी विशेष मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT