BJP accuses Yogesh Kadam esakal
कोकण

Konkan Politics : योगेश कदम कोणत्याही कामात PM मोदींचं नावही घेत नाहीत; भाजपचा शिंदे गटाच्या आमदारावर आरोप

आमदार योगेश कदम यांना भाजप- शिवसेना युती आल्याचा विसर पडला आहे.

सकाळ डिजिटल टीम

योगेश कदम गेल्या दीड वर्षांपासून भाजप सोबत युती आहे हे मानतच नाहीत.

खेड : भाजपला स्थानिक पातळीवरही सन्मान व त्यांनी केलेल्या कामांचे श्रेय मिळत नाही. जलजीवन मिशन केंद्र व राज्य दोन्ही सरकारचा उपक्रम आहे. त्याचेदेखील श्रेय एकटे योगेश कदम (Yogesh Kadam) लाटत आहेत. जलजीवन मिशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे; परंतु योगेश कदम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नावही जलजीवन मिशनच्या कामाची उद्‍घाटन व भूमिपूजन करताना घेत नाहीत, असा आरोप भाजप तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

कदम यांच्याविरोधात भाजपने प्रथमच जाहीर नाराजी व्यक्त केली. कदम सातत्याने भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना डावलत असल्याने खेड येथील भाजप कार्यालयात पत्रकार बोलावली होती. मोरे म्हणाले, ‘‘अनेक कामांची भूमिपूजने व उद्‍घाटने आमदारांनी केली. त्यामध्ये भाजप आमदार संजय केळकर व आमदार प्रसाद लाड यांनी प्रयत्न करून मंजूर करून आणलेल्या कामांचीदेखील भूमिपूजने व उद्‍घाटने त्यांनी केली.

ही कामे भाजपमार्फत मंजूर करून आणली आहेत तरी त्या विकासकामांचे आमदार योगेश कदम यांनी श्रेय घेण्याचे कारण काय. याबाबत पक्षाध्यक्ष यांच्याकडे तक्रार करणार आहे.’’ मोरे म्हणाले, ‘‘कदम यांनी मंजूर करून आणलेल्या कामांचे श्रेय त्यांनी नक्की घ्यावे, त्यांच्या मंजूर कामांच्या पाट्यांवर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांची नावे लावावीत.

परंतु भाजप विकासकामे करत असेल तर त्याचे श्रेय त्यांनी घेण्याचे कारण काय. आमदार योगेश कदम यांना भाजप- शिवसेना युती आल्याचा विसर पडला आहे.’’ या वेळी तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे, सरचिटणीस शशांक सिनकर व पदाधिकारी उपस्थित होते.

दीड वर्षांपासून नाराजी

योगेश कदम गेल्या दीड वर्षांपासून भाजप सोबत युती आहे हे मानतच नाहीत. यापूर्वी मंडणगड व दापोलीमधील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे त्यांच्या कार्यप्रणालीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. कदम यांच्याकडून भाजपला स्थानिक पातळीवर सन्मान व केलेल्या कामांचे श्रेय न मिळाल्यास आगामी कालावधीत होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये युती म्हणून काम करायचे की कसे याबाबत वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविणार आहोत, असे ऋषिकेश मोरे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panvel to Karjat: आता पनवेल ते कर्जत प्रवास फक्त एक तासात होणार, नवीन रेल्वे प्रकल्प अंतिम टप्प्यात, सेवा कधी सुरू होणार? वाचा...

लग्न करू नको...२९ लाख रुपये देते, आईची मुलीला अनोखी ऑफर, पण कारण काय?

'तुमच्या जाण्यानंतर आयुष्य थांबल्यासारखं वाटतय..' प्रार्थना बेहरेला पितृशोक, अपघातात झाला मृत्यू, बाबांसाठी भावूक झाली अभिनेत्री

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा दणका! अवघ्या दोन तासात ९५ मि.मी.पावसाची नोंद

Cracked Heels: भेगांमुळे सतत टाच दुखत आहे का? मग हा 2 मिनिटांचा नैसर्गिक उपाय वापरा

SCROLL FOR NEXT