narayan rane ,ratagiri sakal
कोकण

नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा सुरु

नारायण राणे रत्नागिरीत दाखल; जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात

अर्चना बनगे

रत्नागिरी : नारायण राणेंच्या स्वागताचे बॅनर्स विविध ठिकाणी झळकले असून, भाजप कार्यालयात त्यांचा जंगी सत्कार होणार आहे. राणे हेलिकॉप्टरने जुहू विमानतळ येथून निघून रत्नागिरी विमानतळावर दाखल झाले आहेत. रत्नागिरीत भाजपकडून ढोल ताशाच्या गजरात नारायण राणे यांचं जंगी स्वागत करण्यात येतंय . यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे नेते आशिष शेलार,प्रसाद लाड ‌आहेत. राणे यांच्या तिसऱ्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री राणे हे आज दिवसभर रत्नागिरी शहर, हातखंबा, पाली, लांजा, राजापूर, खारेपाटण, कणकवली शहर, कणकवली येथे होणाऱ्या नागरी कार्यक्रमांना उपस्थित राहतील.

केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा राणेंना अटक, जामीन, सेना विरुद्ध राणे, भाजप अशा कारणांमुळे देशभर गाजली आणि जनआशीर्वाद यात्रा राणेंना दीड दिवस स्थगित करावी लागली. आता ही यात्रा आजपासून रत्नागिरी शहरातून सुरू होणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राणे सकाळी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज, शामराव पेजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना वंदन करून गोळप येथे आंबा प्रक्रिया उद्योजक विजय देसाई फॅक्टरीला भेट देतील आणि आंबा बागायतदार, आंबा कॅनिंग, काजू उत्पादक प्रतिनिधींशी चर्चा करतील. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यानंतर दक्षिण रत्नागिरी भाजप कार्यालयात राणे यांचा सत्कार होणार असून, ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. दुपारी विविध प्रतिनिधी मंडळे राणे यांची भेट घेऊन स्वागत करणार आहेत. राणे लोकमान्य टिळक जन्मस्थानाला भेट देणार आहेत. कुवारबाव भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट व लाभार्थी नागरिकांची भेट घेऊन राणे लांज्याकडे रवाना होतील. तिथे भाजप कार्यकर्ते त्यांचा सत्कार करणार आहेत. राजापूरलाही कार्यकर्ते सत्कार करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT