justice bharati dangare speech in chiplun 
कोकण

म्हणून न्यायालयात अधिक खटले दाखल होतात; न्यायमूर्तींनी सांगितले कारण

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण - सामान्य लोकांना न्याय देण्यात महसूली यंत्रणा कमी पडत असल्यामुळे न्यायालयातील खटल्यांचे प्रमाण वाढले आहे. अशी खंत मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी चिपळूण येथे व्यक्त केली. सामान्य लोकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी महसुलच्या अधिकार्‍यांकडे पाच मिनटाचा वेळ नाही का ? त्यांची जबाबदारी आहे की नाही असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. 

येथे मंजूर झालेल्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन श्रीमती डांगरे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या म्हणाल्या, कोर्टात दाखल होणार्‍या खटल्यांचा विचार केला तर सर्वाधिक खटले गावकी आणि भावकीतील असतात. कोण कोणाचा रस्ता अडवतो तर कोण पायवाट अडवितो कोणावर बहिष्कार टाकला जातो. खासगी जागेची हद्द सिद्ध करण्यासाठी सुद्धा न्यायालयात खटले दाखल होत आहेत. पूर्वी गावचावडीवर लोकांना न्याय दिला जायचा. आता तंटे मिटवण्यासाठी लोक नेत्यांच्या दरबारात जातात. तेथेही न्याय मिळत नाही म्हणून तलाठी कार्यालय ते आयुक्तालयपर्यंत न्याय मागण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी यांनी दोन्ही बाजूच्या लोकांची बाजू समजून घेवून योग्य तो निकाल दिला तर अनेक वाद संपणार आहेत. परंतू तेथे दाखल होणार्‍या खटल्यांचा गांभीर्याने विचार केला जात नाही. खरे तर महसूलच्या अधिकार्‍यांनी एखाद्या विषयाचा कायदेशीररित्या निपटारा करण्याचे ठरवले तर पाच मिनिटात ते न्याय देवू शकतात. पण हे पाच मिनटे त्यांच्याकडे नाही. सामान्य लोकांचा न्याय व्यवस्थेवर अधिक विश्‍वास आहे. प्रत्येकाला न्याय हवा असतो. शेवटचा पर्याय म्हणून लोक न्यायालयाकडे धाव घेतात. महसूलच्या अधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे काम केले तर न्यायालयात दाखल होणार्‍या खटल्याचे प्रमाण कमी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran Conflict : पुढील ४८ तासांत होर्मुझ खुली केली नाही तर इराणचे पॉवर प्लॅंट नष्ट करु, डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्वाणीचा इशारा

Gold & Silver Prices: सोन्याच्या दरात मोठी घसरण; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी?

आजचे राशिभविष्य - 22 मार्च 2026

Sopara Buddhist Stupa : सोपारा बौद्ध स्तूप; इतिहासाच्या कुशीत लपलेलं महाराष्ट्राचं अनमोल ठेवं

मेष राशी साप्ताहिक राशिभविष्य (22 मार्च 2026 ते 28 मार्च 2026) - व्यवसायात तेजी, पण आर्थिक व्यवहारात सावधगिरी आवश्यक

SCROLL FOR NEXT