Kabadevi shore starfish Masha
Kabadevi shore starfish Masha 
कोकण

काळबादेवी किनारी स्टारफिश ; प्रजननासाठी खडकाळ किनारी 

राजेश कळंबटे

रत्नागिरी - शहराजवळील काळबादेवी किनारी स्टारफिश आढळू लागला आहे. हा मासा सापडणे म्हणजे तेथील किनारा प्रदूषणविरहीत असल्याचा निर्वाळाच असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. थंडीच्या मोसमात स्टारफिश प्रजननासाठी उथळ, खडकाळ आणि शिंपले सापडत असलेल्या किनारी दाखल होतात. काळबादेवी किनारी दरवर्षी ऑक्टोबरनंतर हे स्टारफिश दिसतात. याला मत्स्य संशोधकांनीही दुजोरा दिला.

गेले काही दिवस काळबादेवी किनारी स्टारफिश सापडत आहेत. सोशल मीडियावरही त्याचे फोटो व्हायरल होत आहेत. हा मासा सापडणे म्हणजे तो किनारा प्रदुषणविरहीतच. याबाबत मत्स्य संशोधक डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी सांगितले की, स्टारफिश हा आपल्या नलिका पादांचा उपयोग करून समुद्रातील खडक किंवा प्रवाळांवर सरपटत असतो. या माशाच्या खालच्या बाजूला असलेल्या तोंडाने ते खडकावर वाढणार्‍या सूक्ष्म जीव, शैवाल किंवा मृत प्राण्यांच्या शरीरावर उपजीविका करतात. व्हेल किंवा इतर मोठे प्राणी मृत झाल्यावर ते खाण्यासाठी स्टारफिश थव्याने तेथे पोहोचतात असे अभ्यासात आढळून आले आहे. हिवाळ्यात प्रजननासाठी ही ते थव्याने गोळा होतात. उथळ पाण्यात सापडणार्‍या शिपल्यांसाठी स्टारफिश किनारी भागात येतात. वादळी परिस्थितीमुळे लाटा उसळल्याने हा मासा किनार्‍यावर फेकला जातो किंवा मासेमारी करताना ते जाळ्यातही अडकण्याची शक्यता असते. या माशापासून कोणताही धोका होत नाही. हे मासे वाळूमध्ये रुतून राहतात.


काळबादेवी, आरे-वारे किनारे प्रदूषणमुक्त आहेत. या किनारी फिल्टर फीडिंग म्हणजे गाळून खाद्य घेणार्‍या शिंपलावर्गीय मुळ्ये, काकई, कालवं यासारख्या जलचरांचा आढळ असतो. हे शिंपले प्रदूषण नसलेल्या ठिकाणीच वास्तव्य करतात. या दोन्ही किनार्‍यावर कपारीमध्ये शिंपलावर्गीय मासळी सापडते. शिंपलावर्गीय प्राण्यांना खाण्यासाठी वेगळं तोंड नसते. पाण्याबरोबर येणारे अन्नाचे कण हे प्राणी खाद्यान्न म्हणून वापरतात. यामध्ये सर्वाधिक सुक्ष्म जीवांचा समावेश आहे. कर्ला, भाट्ये, जुवे किनार्‍यांवरही ते मिळतात. थंडी सुरू होण्याच्या तोंडावर स्टार फिशचा प्रजनन काळ सुरू होतो. त्यावेळी हे मासे किनारी भागाकडे खाद्यासाठीही झुंडीने वळतात.

खाद्य खरवडून खाणारा प्राणी

स्टार फिशच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. त्यातील काही कोकण किनार्‍यावर आढळतात. हा मासा मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही प्रकारचे अन्न खातो. त्या माशाला छोटे तोंड असते. त्यामुळे खाद्य खरवडून खातात. प्रवाळावरील उगवणारी छोटे प्राणी, प्लवंग, मृत मासे यावर त्यांची गुजराण होते.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरू - गुजरात येणार आमने-सामने; स्पर्धेतील आव्हान टिकवण्याचं दोन्ही संघांसमोर आव्हान

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT